स्वार्थासाठी तालुक्याचा नाश करणाऱ्यांनी विकासाच्या वल्गना करू नये - आमदार राजेश पाटील, तुर्केवाडी येथे दिड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2021

स्वार्थासाठी तालुक्याचा नाश करणाऱ्यांनी विकासाच्या वल्गना करू नये - आमदार राजेश पाटील, तुर्केवाडी येथे दिड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

तुर्केवाडी येथे दिड कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ प्रसंगी बोलताना आमदार राजेश पाटील, शेजारी इतर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विकास कामं सुरू आहेत. हे करत असताना खंत एवढीच आहे की, व्यक्तिगत प्रतिष्ठा व  स्वार्थासाठी तालुक्याचा नाश केला, त्यांनी विकासाच्या गप्पा मारू नये. आमदारापेक्षा अधिक निधी आणला म्हणून वल्गना करत फिरणारे आज अनेकजण आहेत. पण चांगलं ते चांगलं आणि वाईट ते वाईट म्हणण्याची गरज आली. कोलांट उड्या  मारणाऱ्यांनी विकासाच्या गप्पा मारू नयेत, अशी टीका आमदार राजेश पाटील यांनी केली. तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील १.५ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी केला. यावेळी मतदार संघातील विकासाबाबत बोलताना त्यांनी विरोधकांना लक्ष केलं. जि. प. सदस्य अरुण सुतार यांच्या विकास निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचा देखील शुभारंभ यावेळी केला. या अंतर्गत एकूण ७ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांचा विकास कामांचा समावेश आहे.

          चंदगड तालुका पाण्याबाबत समृद्ध असून त्या सर्व बंधाऱ्यांचे मेंटेनन्सच काम आपल्या माध्यमातून होत आहे. पुढील काळातही अशीच कामे करत राहू. आम्ही कामाच्या जोरावर तालुक्याचा विकास करत असून आमच्या कामावर आम्ही पुढे जाऊ आणि आम्ही येऊ असे म्हणणारे आज कुठे आहेत? हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांनी नुसता वाटच पहावी असं म्हणत आपली पुढील दिशाही स्पष्ट केली.

          यावेळी गावातील महोत्सवाच्या निमित्ताने झाड तोडण्याचं काम झालं आता झाड लावण्याचं काम झालं पाहिजे. ग्रामपंचायतीने ते काम हातात घ्यावं असं सूचित देखील केले. वीज वाहिण्याबद्दलही नक्कीच लवकरच वीज मंडळाशी चर्चा करून सुविधा उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला. त्याचबरोबर तुर्केवाडीत संघाच्या तुळशी बाजारचे लवकरच उद्घाटन होणार आसल्याचे सांगितले. तीर्थक्षेत्र, पर्यटन क्षेत्र माध्यमातून विकास करण्यासाठी प्रयन्त केले जात आहेत. ब्रम्हलिंग देवालय 'क' वर्ग तीर्थक्षेत्र होण्यासाठी मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सागितले.यावेळी जि प सदस्य अरुण सुतार म्हणाले, या विभागातच नाही तर मतदारसंघातील सर्वात मोठा निधी उपलब्ध झाला आहे. या सर्व कामाच नियोजन पुढील काळात नक्की पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी सुतार यांनी दिली. या गावाचा विस्तार मोठा आहे, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काम होणं शक्य नसेल तर हद्द वाढवून नगरपंचायत करून या गावाचा विकास व्हावा अशी मागणी यावेळी आमदार यांच्याकडे केली.    तालुका संघाचे संचालक जानबा चौगुले यांनी गावच्या विकासात ग्रामपंचायतीचा निधी कमी पडत आहे. तरी त्याबाबत निधीची तरतूद व्हावी. तसेच ब्रम्हलिंग मंदिराचा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात समाविष्ट करावा अशी मागणी केली. तर गावातील वीज वाहिन्या खूप जुन्या झाल्या असून जीर्ण झाल्यामुळे त्या बदलण्यात याव्यात, ऐतिहासिक रामघाट रस्ता पूर्ण होण्यासाठी सहकार्य केले आहे. गावातील विविध समाज मंदिरे, रस्ते, स्मशानभूमी अशा विकास कामांचे उदघाटन झाले आहे. आणखी काही रस्ते झाल्यानंतर शंभर टक्के गाव रस्ते विकास झालेला असेल. प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामही सुरू झाले आहे.

           यावेळी सरपंच रूद्राप्पा तेली,परशराम पाटील, तालूका संघाचे संचालक तानाजी गडकरी , राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पराशराम पाटील , सरचिटणीस बी . डी . पाटील , संचालक जानबा चौगुले , गोपाळ ओऊळकर , अलि साब मुल्ला , शंकर ओऊळकर , उपसरपंच अरुण पवार , उत्सव समिती अध्यक्ष जोतिबा गावडे , मोहन निवगिरे , बाबू हाजगूळकर ( लक्ष्मण गावडे ) , गोपाळ गावडे , निसार शेख  , नंदकुमार ओऊळकर , लक्ष्मण खोत , सदस्य चेतन बांदिवडेकर , सुतार , भरमाना अडकुरकर , विश्वनाथ ढेकोळकर , भरमाना गावडे यांच्यासह सर्व सदस्य , ग्रामस्थ उपस्थित होते .  सूत्रसंचालन एम.के. पाटील यांनी केले . तर आभार नंदकुमार गावडे यांनी मानले .

No comments:

Post a Comment