डुक्करवाडी शाळेत मुलाच्या वाढदिनी शैक्षणिक साहित्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2021

डुक्करवाडी शाळेत मुलाच्या वाढदिनी शैक्षणिक साहित्य वाटप

 

डुक्करवाडी (ता. चंदगड) येथे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी अवर सचिव सूरेश नाईक, नंदकुमार ढेरे,द.ना.नाईक, मुख्याध्यापक सुतार, सरपंच शिवणगेकर आदी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            डुक्करवाडी -रामपूर (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना डूक्करवाडी गावचे सुपुत्र व मंत्रालयातील महसुल विभागाचे अवर सचिव सूरेश नाईक यानी आपले चिरंजीव विश्वजित याच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप केले.अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते.

नवोदय विद्यालयासाठी निवड झाल्याबद्दल डुक्करवाडी शाळेची विद्यार्थ्यीनी श्रुती वरपे हिची सत्कार करताना अवर सचिव सूरेश नाईक

            प्रारंभी प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र सुतार यांनी केले. यावेळी अवर सचिव सूरेश नाईक यानी प्राथमिक शाळेत मिळणा-या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्याना भविष्य घडविण्यासाठी होतो.त्यामुळे प्राथमिक शाळेतील भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून शाळेसाठी सभामंडप उभारणेकरिता मदत करणार असल्याचे सांगितले. यावेळी नवोदय परीक्षेत यश मिळविलेल्या श्रुती मनोहर वरपे या विद्यार्थ्यीनीचा सत्कार श्री.नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. माजी विस्तार अधिकारी द. ना. नाईक, आर. व्ही. ढेरे, नंदकुमार ढेरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केली. सरपंच राजू शिवणगेकर, अमित वरपे, नामदेव गावडे, नंदकुमार तुर्केवाडकर, जनार्दन सूतार, सूरेश घोळसे, मारुती वरपे, सौ. विद्या नाईक, सौ. संजीवनी वरपे आदींसह पालक उपस्थित होते. सुत्रसंचालन अनंत पाटील यांनी केले तर आभार विलास नाईक यानी मानले. 

No comments:

Post a Comment