आमदार पाटील युवामंचच्या मॅरेथॉन स्पर्धेत मुलामध्ये भोई, मुलींमध्ये रोहिणी पाटील प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2021

आमदार पाटील युवामंचच्या मॅरेथॉन स्पर्धेत मुलामध्ये भोई, मुलींमध्ये रोहिणी पाटील प्रथम

आमदार पाटील युवामंचच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            आमदार राजेश पाटील युवा मंचच्या वतीने पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत मुलामध्ये परशराम भोई, व मुली मध्ये रोहिणी पाटील (दोघेही गडहिंग्लज) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. या मॅरेथॉनमध्ये मुलांसह मुलींना देखील सहभाग घेण्याची संधी मिळाली. 

मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते

        या स्पर्धेला मुलांसाठी ५ किमी व मुली सांठी ३ कि मी अंतर ठेवण्यात आले होते. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे :परशराम लक्ष्मण भोई(गडहिंग्लज), चंद्रकांत मारुती मनवाडकर (किणी), अनिकेत अरुण कुट्रे, प्रमोद दशरथ गावडे, गोपाळ मारुती भालेकर (मुरकुटेवाडी), बबन परशराम शिंदे (नेसरी), तुषार काशिनाथ पालकर, नितेश बयाप्पा नाईक (दाटे), मनोज जोतिबा ढुकळे (मुरकुटेवाडी), पवन कल्लापा मनगुतकर (किणी) तर मुली मध्थे रोहिणी लक्ष्मण पाटील (गडहिंग्लज)वैष्णवी बाळाराम मनगुतकर, रितू कल्लाप्पा पाटील, सारिका चाळोबा पाटील, मयुरी धाकलू कडोलकर, रेखा चाळोबा पाटील, सलोनी श्रीकांत पाटील, सोनाली जानकोजी गावडे, आशा महादेव गावडे, ज्योती जानकोजी गावडे यांनी अनुक्रमे नंबर मिळवले. यशस्वी स्पर्धकांना आम. राजेश पाटील, तानाजी गडकरी, सरपंच शिवाजी तुपारे, अनिल सुरुतकर, पांडूरंग बेनके, जानबा चौगुले, आर. जी. पाटील आदीच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आली.

No comments:

Post a Comment