संत गजाननमध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता (Induction Programme) स्वागतसह मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2021

संत गजाननमध्ये नविन प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता (Induction Programme) स्वागतसह मार्गदर्शन

संत गजानन पॉलिटेक्निक मध्ये आयोजित विद्यार्थी स्वागत समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रातांधिकारी बाबासाहेब वाघमोडे. शेजारी विश्वस्त डॉ. संजय चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे व शिक्षक .....

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

                अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार संत गजानन महाराज रूरल पॉलिटेक्निक महागांव येथे शैक्षणिक २०२१-२२ मधील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्याकरिता दि. २०/१०/२०२१ ते २६/१०/२०२१ या दरम्यान कार्यशाळेचे आयोजन केले होते. 

          यामध्ये संस्थेचा आढावा व तंत्रशिक्षणाची गरज यावावत प्राचार्य डॉ. दाभोळे यांनी माहिती दिली. यावेळी संस्थेतील विभागवार कार्यपध्दती विभागप्रमुखांकडुन सांगणेत आली ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी संतोष गुरव यांनी नवनविन प्लेसमेंट करिता येणा-या कंपनीचा निकष व विद्यार्थी विकास कार्यक्रमाची माहीती दिली विद्याथ्र्यांना. दहावी व बारावीच्या चाकोरीबध्द शिक्षणानंतर व्यावसायीक शिक्षणामध्ये अभ्यासकमपध्दती, इतर माहीती, ऑनलाईन प्रणाली सॉफ्टवेअर, नवनविन अद्यावत प्रयोगशाळा, कॉम्प्युटर तंत्रज्ञानाच्या नविन प्रणाली अवगत करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सेवानिवृत्त इंजिनिअर एम. एम. चिलमी, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. शिवाजीराव भुकेले, प्रा. आर. डी. महापूरे यांना निमंत्रित करणेत आले होते. एक आठवडा चाललेल्या या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात गडहिंग्लज विभागाचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांना आपण केलेल्या कामानुसार आपल्या चेह-यांवर आनंद राहील व विद्यार्थ्याना शैक्षणिक कागदपत्राबाबत प्रशासनाकडुन प्राधान्याने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. शेगांव व सिध्देश्वर मठ येथील धार्मीक संस्थांचा विकास करतानाचा स्वानुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला व विद्यार्थ्यांना आपल्या आई वडीलांची काळजी घेण्याचे आवाहन केले. वयोवृध्दांच्या अडचणींचा प्राधान्याने विचार केला जाईल व संवेदनशीलता जपा असे आवर्जून सांगितले. आजच्या काळात संवेदनशीलता हरवलेली दिसून येत आहे असे सांगितले. संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी जानेवारी २०२२ पासून Innovation व Start up इको सिस्टम संत गजानन मध्ये राबविणेत येईल अशी घोषणा केली तर विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण यांनी आपल्या संस्थेच्या हॉस्पिटलव्दारे वैद्यकीय तांत्रिक रिपोर्टसह पेशंटची क्लिनीकल तपासणीची सांगड घालून पेशंटचे रिपोर्ट सक्षम बनविणारे लॅबोरेटरी टेक्निशनमार्फत निर्माण करणेसाठी संस्था कटीबध्द राहील अशी ग्वाही दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. अॅड. आण्णासाहेब चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सेकेटरी अॅड बाळासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. प्रतिभा चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, सर्व विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते. आभार प्रा. रोहिणी पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment