चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड शहरात नेत्रचिकित्सा मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात आले आहे. चंदगड येथील श्रीराम मंदिर येथे १३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी नऊ ते एक या वेळेत मार्गदर्शक वर्गाचे आयोजन केल्याची माहीती सुनिल काणेकर यांनी दिली.
'तमसो मा ज्योतिर्गमय' (अंधारातून प्रकाशाकडे) ही आपली सांस्कृतिक शिकवण आहे. परमेश्वराने दिलेल्या डोळयाव्दारे आपण हे सुंदर जग पाहतो. दुर्देवाने अलिकडे नेत्ररोगांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत आपली दृष्टी शाबूत ठेवणे आवश्यक आहे. ज्या रुग्णांना काही डोळयांचे वा नेत्रपटलांचे विकार असतील त्यांनी आपले पूर्वीचे सर्व तपासणी अहवाल (रिपोर्टस) व औषधोपचारांची माहिती देवून दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी चंदगड येथील नेत्रचिकित्सा या मार्गदर्शन वर्गास भेट द्यावी.
ज्यांचा चष्म्याचा नंबर उणे पाच (-5) इतका कमी वा त्याहून जास्त आहे किंवा जे रुग्ण अंध आहेत वा अंधत्वाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत अशा रुग्णांनी आपण स्वतः वा आपल्या प्रतिनिधीमार्फत या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घ्यावा. आपल्या विकाराची संपूर्ण तपशीलवार माहिती द्यावी.असे सुनील काणेकर यांनी आव्हान केले आहे. अधिक माहीतीसाठी सुनिल काणेकर यांच्याशी ९४२२६२९४६८ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment