ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड राजकुमारला घेऊन मुंबई पोलीस पून्हा चंदगडात - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2021

ढोलगरवाडी ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंड राजकुमारला घेऊन मुंबई पोलीस पून्हा चंदगडात

तपासासाठी आलेले मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक


तेऊरवाडी ( एस. के. पाटील)

      मुंबई पोलिसांचे अंमली पदार्थ पथक आरोपी ॲड. राजकुमार राजहंसला घेऊन चंदगडमध्ये पोहोचले. या संशयित आरोपीला घेऊन सर्च ऑपरेशन करण्यात येणार आहे. चंदगडच्या ढोलगरवाडी गावातून २ कोटी ३५ लाख रुपयांच ड्रग्स बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं.

          या प्रकरणात आतापर्यंत मास्टरमाईड असणारा वकील राजकुमार राजहंस, केअरटेकर निखिल लोहार आणि मुंबईतील महिला ड्रग्स पेडलर्स ख्रिस्थियाना यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या चंदगडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या फेरीच्या तपासात महत्वाचे धागेदोरे हाती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणी सर्च ऑपरेशनची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

          ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ॲड. राजकुमार राजहंसला घेवून मुंबई पोलिस पुन्हा एकदा चंदगड तालुक्यात हजर झाले आहे. मुंबई गुन्हे अन्वेशन विभागातील अंमली पदार्थ विरोधीपथक कारवाईसाठी आरोपी राजहंस व फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार यांना घेवून ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसवर पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. यावेळी केअरटकरच्या घरी देखिल जावून पोलिसांनी पाहणी केलेली आहे. तसेच बेळगाव या ठिकाणी देखील तपासणी केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

           मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणाचा थेट संबंध चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडीशी असल्याचे मागिल तपासात स्पष्ट झाले होते. दरम्यान, ढोलगरवाडी येथील फार्म हाऊसचा केअरटेकर निखिल लोहार तसेच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर मांईड ॲड. राजकुमार राजहंस याला घेवून मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा चंदगड तालुका गाठला आहे. या ठिकाणी मुख्यता आरोपींना घेवून या एमडी ड्रग्ज बनवण्यासंबंधी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्याचे काम केले जाणार असल्याचे समजते आहे. यामध्ये आरोपींविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून केअरटेकर निखिल लोहार व राजकुमार राजहंस यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आता चंदगड तालुक्यातील इतर कोणत्या ठीकाणी या ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन आहे का? यापूर्वी बसर्गे हद्दीतील एका पोल्ट्री फार्मवर कारवाई करून सिल करण्यात आले होते. त्याचा या प्रकरणात काही संबंध आहे का? या सर्व बाबींसंदर्भात आरोपी यांना घेवून मुंबई पोलिसांकडून तालुक्यीतील अन्य धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न असून परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही केस स्ट्रॉग केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणात चंदगड मधील आणखी कोणाचा हात आहे का ?याची चौकशी हे पथक करणार आहे.

No comments:

Post a Comment