कळसगादे येथील गायरान खुले करुन बांधकामाची चौकशी करावी - ग्रामस्थांची निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2021

कळसगादे येथील गायरान खुले करुन बांधकामाची चौकशी करावी - ग्रामस्थांची निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मागणी

जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कळसगादे ग्रामस्थ. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          कळसगादे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत गायरान गट नं. ११९ व इतर गायराने जनावरे चरण्यासाठी त्याचा वापर होता. मागील काही वर्षात २०१५ ते २०२० या कालावधीत गट नं. ११९ मध्ये पदाचा गैरवापर करून सदरील गायरानमध्ये पोल्ट्री शेड बांधण्यात आले आहे. लोकांना त्या जमिनीमध्ये गुरे चारण्यासाठी अडवणूक व धमकी देण्यात येत आहे. या जमिनीची आपल्या स्थरावर चौकशी होवून कळसगादे ग्रामस्थांना न्याय मिळावा व गायरान खुली करून मिळावे अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

No comments:

Post a Comment