सर्पमित्र बाबुराव टक्केकरांनी सर्प संवर्धनाबरोबरच सत्यशोधक चळवळ गतिमान केली - भरमुअण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2021

सर्पमित्र बाबुराव टक्केकरांनी सर्प संवर्धनाबरोबरच सत्यशोधक चळवळ गतिमान केली - भरमुअण्णा पाटील

आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांना आदरांजली वाहताना मान्यवर.

कालकुंद्री : श्रीकांत पाटील

        आद्य सर्पमित्र कै बाबुराव टक्केकर यांनी चंदगड तालुक्यातील अंधश्रद्धा व जातीयता निर्मूलनाचे महान कार्य केले. पर्यावरण संतुलनातील महत्त्वाचा घटक सापांचे रक्षणाबद्दल जनजागृती करण्याबरोबरच महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा वारसा पुढे चालवला. असे प्रतिपादन माजी रोहयो मंत्री भरमुअण्णा पाटील यांनी केले. ते ढोलगरवाडी, ता. चंदगड येथे सर्पमित्र बाबुराव टक्केकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते.

        ढोलगरवाडी येथील शेतकरी शिक्षण मंडळ च्या मामासाहेब लाड विद्यालय व वाघमारे सट्टूप्पा टक्केकर जुनियर कॉलेजच्या वतीने टक्केकर यांचा पाचवा स्मृतिदिन अंधश्रद्धा निर्मूलन दिन म्हणून पाळण्यात आला. अध्यक्षस्थानी झी. नी. पाटील गुरुजी होते. प्रास्ताविक संस्था उपाध्यक्ष व सर्पोद्यान चे संचालक तानाजी वाघमारे यांनी केले. प्रतिमापूजन सरपंच सौ सरिता तुपारे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुढे बोलताना भरमूअण्णा म्हणाले सन १९७२ मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच १९६० पासूनच टक्केकर यांनी सामाजिक रोष पत्करून सर्प संवर्धनाची मोहीम हाती घेतली होती. त्यांनी निर्माण केलेल्या जगातील एकमेव सर्पशाळेला शासनस्तरावरून योग्य त्या मदतीसाठी आपण प्रयत्न करू असे सांगितले.

            यावेळी ॲड. संतोष मळवीकर, हलकर्णी कॉलेजचे प्राचार्य पी. ए. पाटील, संस्था अध्यक्ष डाॅ. नितीन चौगुले, विद्या चौगुले-पाटील, एन. एन. पाटील, एस. एस. कोकितकर,  डाॅ. नंदकुमार गावडे, सोलापूरचे सर्पमित्र राहुल शिंदे, सेवानिवृत्त पीएसआय विजय ओऊळकर, प्रकाश यशवंत टक्केकर, एस. डी. पाटील, ज्योती तुकाराम गुरव आदींनी टक्केकर सरांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना त्यांनी निर्माण केलेली जगावेगळी सर्पशाळा पर्यटन व संशोधन केंद्र म्हणून विकसित होणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे विचार व्यक्त केले. यावेळी सोलापूर व जयसिंगपूर  होऊन आलेल्या सर्पमित्रांनी साप पकडण्याची आधुनिक सामुग्री भेट दिली. यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातून जयसिंग देसाई, कडलगे बुद्रुकचे सरपंच सुधीर गिरी, सुनीता गावडे, माजी मुख्याध्यापक कुट्रे, धानबा कदम, उपसरपंच बाबुराव तुपारे, सौ. सुष्मिता संजय पाटील, शोभा विलास कांबळे, गणपत कणगुटकर,  राजाराम पाटील, मनोहर पाटील,  प्रा गुंडूराव कांबळे, शिवाजी तुपट, रघु नाईक, अक्षय कलखांबकर, मल्लू गावडे, बी. टी. पाटील, संतोष सुभेदार, गणपत ओऊळकर, इंद्रकुमार टक्केकर, वैजनाथ कांबळे, मारुती बुवा, कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य एन. जी. यळूरकर, श्रीमती शांता बाबुराव टक्केकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस. जी. पाटील यांनी केले. हर्षा शंकर कागणकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment