शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करू : जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, शिनोळी येथे राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2021

शेतकऱ्यांची दौलत शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठी प्रयत्न करू : जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, शिनोळी येथे राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाची सुरुवात

शिनोळी येथे सभेमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, शेजारी इतर मान्यवर मंडळी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत शेतकरी  सहकारी साखर कारखाना हा पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात सहकारी तत्त्वावर  देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नशील असून या संबंधी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ तसेच वरिष्ठ पातळीवर चर्चा करून प्रयत्न करू असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी दिले.शिनोळी ता.चंदगड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाचा आढावा सभेत ते बोलत होते.

दौलत हा सहकारातील सर्वात मोठा कारखाना असून तो सध्या खासगी कंपनीमार्फत चालवला जात आहे. हा कारखाना चालवण्यास देतेवेळी तालुका संघावर अन्याय झाल्याची खंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व चंदगड तालुका संघाच्या सभासदांनी व्यक्त केली. त्यावर बोलताना पाटील यांनी हे आश्वासन दिले. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत आमदार राजेश पाटील यानी केले. म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या पुढाकाराने चंदगड मतदारसंघात दोनशे कोटींची विकासकामे खेचून आणण्यात यश आले आहे. सरकारला आज दोन वर्षे पूर्ण होत असताना मतदारसंघात आरोग्य शिक्षण तसेच जलसंपदाची अनेक विकास कामे होत असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे. याच कामाच्या जोरावर येत्या पं. स. व जि.प निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व जागा असा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे अनिल साळोखे, बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, तालुका अध्यक्ष भिकू गावडे, परशराम पाटील, जानबा चौगुले, तानाजी गडकरी,महादेव पाटील, अभय देसाई आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते..

 शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 'राष्ट्रवादी परिसंवाद अभियान'

१२डिसेंबर रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१व्या  वाढदिवसानिमित्त १ ते १० डिसेंबर दरम्यान 'राष्ट्रवादी परिसंवाद अभियान' घेतले जाणार आहे. या दरम्यान विविध कार्यक्राअंतर्गत शरद पवार यांचे विचार तळागाळात पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच विविध विधायक कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.


No comments:

Post a Comment