अडकूर येथील सुरेश दळवी यांची काँग्रेस पक्षाकडून निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती - चंदगड लाईव्ह न्युज

29 November 2021

अडकूर येथील सुरेश दळवी यांची काँग्रेस पक्षाकडून निवडणूक निरीक्षकपदी नियुक्ती

सुरेश दळवी

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

          अडकुर गावचे सुपुत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी सुरेश दळवी यांची पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने अडकूर विभागातून नाही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रदेश पदाधिकाऱ्याना निरीक्षक म्हणून नियुक्ती करून जबाबदारी देण्यात आली आहे.

          महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेक्रेटरी सुरेश दळवी हे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, मिरा भाईंदर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस, मिरा भाईंदर मराठा संघाचे अध्यक्ष, मिरा भाईंदर पालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांचे विश्वासू सहकारी म्हणून युवक काँग्रेसपासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दळवी यांनी काँग्रेस पक्षात स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत असून काँग्रेस पक्ष विक्रमगड नगरपंचायत निवडणुकीत चांगले यश मिळवेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment