महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रम,उच्च शिक्षित शिक्षक,संशोधनास चालना, प्लेसमेंटची हमी तसेच फिनिशिंग स्कूल हा वेगळा उपक्रम राबविला जात आहे.परिणामी यावर्षी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेस विद्यार्थी उस्फुर्त प्रतिसाद देत प्रथम क्रमांकाचे पसंतीक्रम देण्यात प्राधान्य देत आहेत. येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या भविष्यातील नवीन तंत्रज्ञानाचे कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गेली पाच वर्षापासुन फिनीशिंग स्कूलचा नाविन्य उपक्रम संगणक व इलेक्ट्रिक व टेलीकम्यूनिकेशन या विभागासाठी राबवण्यात येत आहे. याच धर्तीवर यावर्षी मेकॅनिकल सिव्हिल व इलेक्ट्रिकल या विभागासाठी काम करत आहे जेणेकरून भविष्यामध्ये उद्योजक म्हणून येथील विद्यार्थी इतरत्र आपला वेगळा ठसा उमटवेल तसेच विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टिने प्रयत्न सुरु आहे.
प्लेसमेंट विभागानेही येथे उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आतापर्यंत प्लेसमेंटच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी देशविदेशातील नामवंत कंपनीत सर्वाधिक वेतनावर महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. यामध्ये प्रणिता शिंत्रे व अक्षय कुमार नावगेकर यांची कॉग्निझंट, दिपाली नेवडे व सोनाली पाटील यांची टीसीएस आणि स्नेहल नार्वेकर हिची विप्रो या कंपनीत असिस्टंट सिस्टिम इंजिनिअरिंग ट्रेनी या पदावर सर्वाधिक वेतनावर नियुक्ती झाली आहे.कोरोना काळातही विविध कंपन्यांचे अॉनलाईन मुलाखतीचे आयोजन करीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करुन दिला आहे. यावेळी ३४ हून अधिक कंपन्यांमध्ये १५३ हून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच कारणामुळे या शैक्षणिक वर्षी नवीन प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक प्रथम व द्वितीय वर्ष विकल्प निवडण्याची पसंती देत आहेत. प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत याच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडत आहे.
No comments:
Post a Comment