पुंद्रा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कानुर ब्रदुक येथे उच्वला योजनेअंतर्गत एचपी गॅसचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

पुंद्रा ग्रुप ग्रामपंचायतीच्या कानुर ब्रदुक येथे उच्वला योजनेअंतर्गत एचपी गॅसचे वितरण

कानुर बुद्रुक (ता. चंदगड) येथे भावेश्वरी पतसंस्थेजवळ मोफत गॅसचे वितरण मॅनेजर संजय आगाशे व स्वराज एचपी गॅस एजन्सीचे मालक अभिजित देसाई यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ग्रुप ग्रामपंचायत पुंद्रा मधील मौजे कानुर बुद्रुक (ता. चंदगड) येथे पंतप्रधान उज्वला योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत मोफत एचपी गॅसचे वितरण करण्यात आले. 

          यावेळी सक्षमीकरण व त्यांच्या आरोग्याची निगा राखणे, स्वयंपाक करताना लाकडी जळण वापरल्यामुळे होणारे तीव्र दुष्परिणाम कमी करणे, स्वयंपाकासाठी अस्वच्छ जळण वापरल्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करणे, घरात लाकडी जळण वापरल्यामुळे लहान बालकांना बऱ्याच मात्रेत होणाऱ्या श्वासोच्छवासाच्या तक्रारी दूर करणे, हा मुख्य उद्देश या योजनेचा असल्याचे स्वराज एचपी गॅस एजन्सीचे मालक अभिजित देसाई यांनी सांगितले.

       गॅस शेगडी सरपंच सौ. सुवर्णा येमेटकर, उपसरपंच संतोष गावडे सदस्य सौ. संजना आगाशे, पुंडलीक राऊत (ग्रामसेवक), शुभांगी देसाई, नामदेव मोरे, अशोक पाटील (पो. पाटील), संजय आगाशे, कृष्णा गणाचारी, विक्रम कोंडुसकर, निवृत्ती गुरव, रमेश खोत, भावेश्वरी पतसंस्थेचे कर्मचारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याकामी कानुर बुद्रुक येथील भावेश्वरी पतसंस्थेचे सहकार्य लाभले. 

      मौजे कानुर बुद्रुक (बामनाकिवाडी) नांदुरे ,मासुरे या गावामध्येही गॅसचे वाटप झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दिवटे, नामदेव गावडे, सचिन साबळे, विनायक चौकूळकर, विश्वास चौकूळकर, मंगल कोळगे, जयश्री चौकुळकर, सुरेखा नाईक, इंदुबाई गावडे, आनंदी नाईक, सरिता तराळ, सरस्वती साबळे, अर्चना गावडे, लक्ष्मी गेळेकर लाभार्थी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment