महागाव येथील संत गजाननमध्ये माजी सैनिकांसाठी सस्नेह संमेलनाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2021

महागाव येथील संत गजाननमध्ये माजी सैनिकांसाठी सस्नेह संमेलनाचे आयोजनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        भारतीय सैनिक संयुक्त कमिटी कोल्हापूर जिल्हा पुरस्कृत, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कर्नाटक सीमावर्ती भागातील सर्व आजी माजी सैनिक संघटना व संत गजानन महाराज मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर महागाव यांच्या संयुक्त विद्यमानाने माजी सैनिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण व समाधान शोधण्यासाठी भव्य माजी सैनिक सस्नेह सम्मेलन सोहळ्याचे 14 नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी 10 वाजता हसुरवाडी येथील संत गजानन महाराज शिक्षण समुह संकुल येथे आयोजित करण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

   या सोहळ्यात वरील प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच त्यांचे  पेंन्शन जीवन प्रमाण पत्र, ईसीएचएस कार्ड विनामूल्य बनवून देण्यात येणार आहे . शिवाय ईसीएचएस व इतर विषयावरही मार्गदर्शन लाभणार आहे.                      सर्व माजी सैनिकांनी उपस्थित राहून आपल्या समस्यांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन कर्नल विलासराव सुळकुडे यांनी केले आहे. यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, ॲड. बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय दाभोळे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment