चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
उमगाव (ता. चंदगड) येथील प्राथमिक शाळेत शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.शासनाने या शाळेत त्वरित शिक्षक नेमावा अशी मागणी पालकवर्गात होत आहे.
या शाळेत १ ली ते ७ वी पर्यतचे वर्ग असून ९० पटसंख्या आहे. या ९०विद्यार्थाना फक्त २ शिक्षक शिकवत आहेत. या दोन शिक्षकापैकी एक शिक्षक प्रशासकीय कामांकरिता शिक्षक लागत असून सर्व वर्गाची जबाबदारी एका शिक्षकावर पडते. त्यामुळे एका शिक्षकाकडून सात वर्ग सांभाळताना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे पंधरा दिवसात मंजूर पटानूसार या शाळेत शिक्षक न दिल्यास शाळेला टाके ठोकण्याचा इशारा स्वयंम जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकात गावडे, संभाजी सावंत, उपसरपंच रुक्माणा गावडे, जयसिंग हाजगूळकर, गोपाळ कांबळे, रमेश अमृसकर, ईश्वर गावडे, दीपक गावडे, परशुराम गावडे, संतोष गावडे, महेश गावडे, सागर गावडे, लखन गावडेसह आदी ग्रामस्थांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment