तेऊरवाडीचा ट्रॅक्टर विजापूरला, दोन ट्रॉल्या गायब, काय आहे नेमका प्रकार............वाचा...... - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2021

तेऊरवाडीचा ट्रॅक्टर विजापूरला, दोन ट्रॉल्या गायब, काय आहे नेमका प्रकार............वाचा......

ट्रक्टर


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील सुधिर कृष्णा पाटील यांचा हंचनाळ (ता. हुक्केरी) येथून आठवड्यापूर्वी चोरीस गेलेला ट्रॅक्टर विजापूरजवळ एका शेतात कर्नाटक पोलिसांना सापडला. मात्र या ट्रॅक्टर सोबत असणाऱ्या दोन ट्रॉल्या व इंजिनचे काही पार्ट मात्र चोरट्यानी गायब केले आहेत. यासंदर्भातील गुन्हा यमकरमरडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.

     तेऊरवाडीच्या सुधीर पाटील यांनी हेमरस कारखान्याकडे ऊस पुरवठ्याचा करार केला आहे. त्यांसाठी बीड येथील टोळी ऊसतोड करत आहे. शिवनगे (ता. चंदगड) येथील ऊसतोड करण्यात येत होती. पण मागील काही दिवसात पाऊस पडल्याने  या परिसरात ऊस तोड थांबली. त्यानंतर  आपल्या ट्रॅक्टरचा ड्रॉयव्हर असलेल्या हंचनाळ येथे ऊस तोडायला सुरवात केली. ड्रॉयव्हरने ट्रॅक्टर रात्री आपल्या दारामध्ये उभा करून झोपला. सकाळी ट्रॅक्टर चोरीला गेल्याने लक्षात आहे. यानंतर ट्रॅकटरचा शोध घेण्यात अपयश आल्याने यमकरमरडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. विजापूर जिल्हयातील तिकोटा पोलिसांनी संबधित ट्रॅक्टरचे इंजिन एका शेतात मिळाल्याची माहिती दिली. या इंजिनचे हूड, टेप, बॅटरी हूक, हॉर्न  चोरट्यानी लंपास केले आहेत. डिझेल संपल्याने चोरटे हे ट्रॅक्टर शेतातच सोडून गेले. मात्र दोन्ही ट्रॉल्या अजूनही सापडू शकल्या नाहीत.

                        *ट्रॅक्टर चोर टोळी सक्रीय* 

           गेल्या काही महिन्यापासून सीमा भागात ट्रॅक्टर चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. या संदर्भातील चोरट्याना नेसरी व कोवाड पोलीसांनी पकडून ट्रॅक्टर चोरीचा छ लावला होता. चोरलेले ट्रॅक्टर तासभरात खोलून ते स्क्रॅबला विकले जात असल्याची चर्चा आहे. अशा स्क्रॅब खरेदी करणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्यास या चोरींचा छडा लागू शकतो असे जाणकारांचे मत आहे.

No comments:

Post a Comment