संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या 161 विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड “12 विद्यार्थ्यांना दोन पेक्षा जास्त ऑफर्स” - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2021

संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या 161 विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड “12 विद्यार्थ्यांना दोन पेक्षा जास्त ऑफर्स”

यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. संजय सावंत व शिक्षकवृंद

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांची नामवंत कंपनीमध्ये निवड झाली. यामध्ये योगिता काईंगडे व मानसी कदम यांची कॅपजेमिनी अक्षय कुमार नावगेकर यांची कॉग्निझंट, दिपाली नेवडे व सोनाली पाटील यांची टीसीएस आणि धनश्री नेवरीकर, बॉबी चीलमी, प्रणिता शिंत्रे हिची विप्रो या कंपनीत असिस्टंट सिस्टिम इंजिनिअरिंग ट्रेनी या पदावर नियुक्ती झाली. सर्वांना चार लाखाचे वार्षिक वेतन व कंपनीच्या इतर सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहेत. १२ विद्यार्थ्याना दोन पेक्षा जास्त नामांकित कंपन्यांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.

            मागील दीड वर्ष आपण कोरोना महामारी काळा मधून जात आहे . शैक्षणिक महाविद्यालयांसाठी हा काळ फारच खडतर असा आहे. या काळामध्ये सुद्धा विविध कंपन्यांचे मुलाखती घेण्यामध्ये व त्यांना कोरोणा प्रतिकूल परिस्थितीमध्ये नोकरीच्या विशेष संधी उपलब्ध करून देण्यामध्ये एस. जी. एम. कायमच एक पाऊल पुढे राहिले आहे. यामध्ये तब्बल ३५ हून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये १६१ हून अधिक विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. याच कारणामुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नवीन प्रवेशासाठी प्रथम व द्वितीय वर्ष विकल्प निवडण्याची विद्यार्थ्यांची पसंती एस. जी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ड. आण्णासाहेब चव्हाण यांनी एस. जी. एम. महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले.

         संत गजानन महाराज शिक्षण संस्थेने दर्जेदार अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्यासाठी प्रयत्न प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज पर्यंत अनेक विद्यार्थी या संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी नोकरीवर कार्यरत आहेत.

         यावेळी संस्थेचे डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याकामी प्राचार्य डॉ. संजय सावंत,  प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. संतोष गुरव, प्रा. महादेव बंदी, सर्व विभागप्रमुख व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

No comments:

Post a Comment