Home
chandgad
चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत बांदेश्वर बांदा संघ अजिंक्य, चंदगड अर्बन बँकेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन, द्वीतीय, तृतीय व चतुर्थ विजेते कोण......वाचा.........सविस्तर........
चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेत बांदेश्वर बांदा संघ अजिंक्य, चंदगड अर्बन बँकेच्या वतीने स्पर्धेचे आयोजन, द्वीतीय, तृतीय व चतुर्थ विजेते कोण......वाचा.........सविस्तर........
चंदगड अर्बन चषक २०२१ क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या बांदेश्वर बांदा संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस व चषक चंदगड अर्बन बँकेच्या वतीने देताना चेअरमन दयानंद काणेकर, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर व इतर.
संपत पाटील, चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या चंदगड अर्बन क्रिकेट चषक २०२१ तृयीय वर्षाच्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बांदेश्वर बांदा संघाने अजिंक्यपद पटकावले. तर के. के. शिनोळी संघाला उपविजेतेपद मिळाले. युवा स्पोर्टस् चंदगड संघाने तृतीय तर आर. बी. स्पोर्टस् संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगणावर स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये २६ संघांनी सहभाग घेतला होता.
तृतीय क्रमांकाचे बक्षिस युवा स्पोर्टसच्या खेळाडूना देताना सुधीर देशपांडे, झाकीर नाईक आणि मेहताब नाईक.
चंदगड अर्बन बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेला चंदगड शहरासह शेजारील गावांतूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेमध्ये मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेळगावसह बांदा, निपाणी, कोनाळकट्टा, बेळगाव, बहादुरवाडीसह चंदगड येथील खेळाडू व संघानी भाग घेतला होता.
स्पर्धेतील अंतिम सामना बांदेश्वर बांदा व के. के. शिनोळी यांच्यामध्ये झाला. बांदा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंजदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिनोळी संघाला क्षेत्ररक्षण करावे लागले. त्यांनी दहा षटकांमध्ये सुंदर फटकेबाजी करत मर्यादित दहा षटकामध्ये 114 धावांचे आव्हान शिनोळी समोर उभे केले.
बांदा संघासमवेत ट्राॅफीसोबत चेअरमन दयानंद काणेकर व त्यांचे चिरजीव
यामध्ये ताऊ नाईक यांनी २१ चेंडूत ४१ धावा केल्या. यामध्ये ६ षटकार व ४ चौकारांचा समावेश आहे. दाजी नाईक याने ९ चेंडून ३४ धावांची तुफानी खेळी करत प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये त्यांनी एकाच षटकात ६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला. गुरुप्रसादने १५ चेंडूत ३३ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार व २ चौकारांचा समावेश होता.
प्रत्यत्तरादाखल शिनोळी संघाच्या संदिप व बबलुने ४ षटकात ३८ धावांची सलामी दिली. यामध्ये संदिपने २३ चेंडूत ३५ धावा तर नंदुने ९ चेंडूत १५ धावा केल्या. बांदा संघाच्या भेदक गोलंदाजीपुढे दहा षटकामध्ये के. के. शिनोळी संघाला ७ बाद ७८ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे बांदेश्वर बांदा संघाने के. के. शिनोळी संघावर ३६ धावांनी विजय मिळविला.
बांदा संघाने विजय मिळविताच मैदानाच्या बाजूने बसलेल्या पेक्षकांनी मैदानात धावत येऊन बांदा संघाला खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना खांद्यावर उचलून घेत फटाके व नाचून आनंद व्यक्त केला. अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. अजिंकपद पटकावलेल्या बांदेश्वर बांदा संघाला ७१ हजारांचे दयानंद काणेकर व मारुती कुंभार यांच्याकडून दिलेले बक्षिस व चषक देवून गौरविण्यात आले. तर द्वीतीय क्रमांक पटकावलेल्या के. के. शिनोळी संघाला ४१ हजारांचे प्रमोद कांबळे यांनी दिलेले बक्षिस व चषक देवून गौरविण्यात आले.
तृतीय क्रमांकासाठी युवा स्पोर्टस् चंदगड व आर. बी. स्पोर्टस् नागनवाडी यांच्या लढत झाली. यामध्ये युवा स्पोर्टस् चंदगड संघाने टास जिंकून क्षेत्ररक्षण निवडले. त्यामुळे आर. बी. स्पोर्टस् नागनवाडी संघाला फलंजादी करावी लागली. आर. बी. स्पोर्टस् नागनवाडी संघाने मर्यादित १० षटकात ७ बाद ९१ धावांचे लक्ष युवा स्पोर्टस् चंदगड यांच्यासमोर ठेवले. यामध्ये अभिषेकने १९ चेंडूत २५ धावा केल्या. मुजाहिदने १३ चेंडूत २० धावा केल्या तर अजय चंदनवाले याने युवा स्पोर्टस् चंदगड यांच्या विरोधात गोलंदाजी करताना १३ धावा देवून २ विकेट घेतल्या.
उत्तरादाखल युवा स्पोर्टस् चंदगड यांनी सावध खेळी करत ९.१ षटकात ५ बाद ९२ धावा केल्या. यामध्ये सागरने ९ चेंडूत १९ धावा, जोतिबाने १३ चेंडूत १७ धावा, पवनने ७ चेंडूत १४ धावा तर शफीकने नाबाद १३ धावा केल्या. शेवटी ५ चेंडूत ठेवून युवा स्पोर्टस् चंदगडने आर. बी. स्पोर्टस् नागनवाडी संघावर विजय मिळवत तृतीय क्रमांक मिळविला. त्यांना २१ हजार रुपयांचे वैजाप्पा शिवलिंगाप्पा वाली यांनी दिलेले बक्षिस मिळाले व व चषक देवून गौरविण्यात आले. तर आर. बी. स्पोर्टस् नागनवाडी संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांना ११ हजारांचे फिरोज अब्दुलरशिद मुल्ला यांनी दिलेले बक्षिस व चषक देवून गौरविण्यात आले.
विजेत्यांना चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन व पं. स. सदस्य दयानंद काणेकर, व्हाईस चेअरमन बाबुराव हळदणकर, संचालक संजय ढेरे, अरुण पिळणकर, शिवानंद हुंबरवाडी, प्रमोद कांबळे, विनायक पिळणकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिस वितरण करण्यात आले. पावसाच्या व्यत्ययामुळे दिड महिना चाललेली स्पर्धा पार पाडण्यासाठी बँकेचे कर्मचारी वर्ग, युवा स्पोर्ट्स चंदगडचे खेळाडू व नगरपंचायत सफाई कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेसाठी खेडूत शिक्षण मंडळाने मैदान उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. या स्पर्धेसाठी हिदायक नाईक, विनायक पिळणकर, के. सी. कांबळे यांनी यांनी पंच म्हणून काम पाहिले. सामन्यांचे संपुर्ण समालोचन जमीर आगा व इतरांनी उत्कृष्टरित्या केले. बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय चंदगडकर यांनी केले. आभार चेअरमन दयानंद काणेकर यांनी मानले.
अंतिम सामन्यातील टर्निंग पाँईंट
अंतिम षटकामध्ये बांदेश्वर बांदा संघाच्या दाजी नाईक यांनी केलेली खेळी शिनोळी संघाच्या पराभवाला कारणीभूत तर बांदा संघाच्या विजयाला कारणीभूत ठरली. दाजी नाईक यांनी शेवटच्या दहाव्या षटकात ५ षटकार ठोकले. ताऊ नाईक यांनी मारलेले ३ षटकार याच धावा के. के. शिनोळीसाठी अडचणीच्या ठरल्याने त्यांचा ३६ धावांनी पराभव झाला.
मॅन ऑफ द मॅच – ताऊ नाईक (बांदेश्वर बांदा)
मॅन ऑफ द सीरीज –जोतिबा पाटील (युवा स्पोर्टस् चंदगड)
उत्कृष्ट फलंजाद – दाजी नाईक (बांदेश्वर बांदा, २८ चेंडूत १११ धावा, २ सामने १४ दिवस)
उत्कृष्ट गोलंदाज – रब्बानी (११ विकेट, के. के. शिनोळी संघ)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील, सोबत ना. हसन मुश्रीफ व मान्यवर. चंदगड : सी एल वृत्तसेवा चंदगड तालुक्यात...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment