कालकुंद्री तंटामुक्ती कमिटी अध्यक्षपदी शंकर कोले, उपाध्यक्ष बाजीराव पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2021

कालकुंद्री तंटामुक्ती कमिटी अध्यक्षपदी शंकर कोले, उपाध्यक्ष बाजीराव पाटील

कालकुंद्री येथे तंटामुक्त कमिटी निवडीनंतर ग्राम दैवत कलमेश्वर चे दर्शन घेऊन कामकाज सुरू केले.

 कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
   कालकुंद्री ता. चंदगड येथील महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीची मागील महिन्यात झालेल्या ग्रामसभेत निवड करण्यात आली होती. अध्यक्षपदी माजी सैनिक शंकर दत्तू कोले तर उपाध्यक्ष म्हणून बाजीराव यल्लाप्पा पाटील यांची निवड करण्यात आली. उपसरपंच संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नव्या कमिटीचा पदग्रहण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
   स्वागत पोलीस पाटील संगीता कोळी यांनी केले. उर्वरित कमिटीत छाया जोशी (सरपंच), संभाजी राणबा पाटील (उपसरपंच), विलास शेटजी, अझरुद्दीन शेख, विजया कांबळे (ग्रामपंचायत सदस्य), याशिवाय सुरेश सट्टूपा नाईक, मल्लाप्पा हणमंत परीट, नरसु परशराम पाटील, गणपती विठोबा पाटील, शरद रामू जोशी, अर्जुन हनमंत परीट, तुकाराम कल्लाप्पा जोशी, आसिफ मोमीन, किसन लोहार, पुंडलिक गोपाळ जोशी, सुशांत कल्लाप्पा पाटील, प्रकाश शिवाजी कोकितकर, कांचन शिवाजी पाटील, वैशाली प्रताप पाटील, उमा शंकर मुर्डेकर, माया अजित पाटील, शुभम मुंडे, दत्तात्रय नाईक (ग्रामसेवक), संगीता उत्तम कोळी पोलीस पाटील तथा सचिव यांचा समावेश आहे.
 यावेळी नूतन कमिटीचे स्वागत तर मावळत्या कमिटी सदस्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.  नूतन अध्यक्ष शंकर कोले यांनी गावातील भांडण तंट्यांची निपक्षपातीपणे सोडवणूक करून कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. पदग्रहण समारंभ नंतर कमिटीने ग्रामदैवत श्री कलमेश्वर चे दर्शन घेऊन कामकाजाला सुरुवात केली. यावेळी कमिटीतील आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ग्रामसेवक दत्तात्रय नाईक यांनी मानले.



No comments:

Post a Comment