पुतळा विटंबना करणाऱ्या गुंडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा - श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठानची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2021

पुतळा विटंबना करणाऱ्या गुंडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा - श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठानची मागणी

 

चंदगड / प्रतिनिधी

बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचे  पडसाद आज चंदगड तालुक्यात ही उमटले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबनेचा जाहीर निषेध करत विटंबना करणाऱ्या कन्नड गुंडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंद करून त्वरीत शिक्षा देण्यात यावी अशी मागणी श्रीराम सेना हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठान हिंदुराष्ट्र प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आली. या बाबतचे निवेदन चंदगड तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले.

 कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड गुंडांनी आपला भगवा धर्मध्वज याची विटंबना करून जाळला. त्या गुंडांची चौकशी करून त्यांना त्वरीत शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज श्री रामसेना हिंदुराष्ट्र सेना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या मार्फत चंदगडमध्ये आज निषेध व्यक्त करण्यात आला. कर्नाटक सरकार तसेच या घटनेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चंदगड येथील तहसीलदार कार्यालय तसेच पोलिस स्टेशनला भेट देत याबाबतचे निवेदन देण्यात आले. No comments:

Post a Comment