बंगळूरू येथील घटनेचा नेसरी ग्रामस्थांकडून निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

19 December 2021

बंगळूरू येथील घटनेचा नेसरी ग्रामस्थांकडून निषेध

बंगळुरू येथील घटनेचा निषेध करताना नेसरी येथील ग्रामस्थ

नेसरी / सी. एल. वृत्तसेवा

           बंगळुरू येथील सदाशिव नगरमध्ये शुक्रवारी अज्ञातांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची शाई फेकून विटंबना करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी  नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील बसस्थानकावरील सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्याजवळ नेसरी परिसरातील शिवप्रेमी व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन  बंगळुरू येथील घटनेचा निषेध व्यक्त केला.

          छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव... अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी प्रकाश मुरकुटे व प्रसाद हल्लाळी यांनी समाजकंटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी विलास हल्याळी, बबन नाईक, किरण हिडदुगी, अजित गुरव, साजन सुतार, पुंडलिक चव्हाण, कुणाल सुतार, कैफ दड्डिकर, प्रशांत मुरकुटे, मोसिन मालदार, बबलू पाटील ,रोहित गंगली, रोहन रेडेकर, ओंकार लष्करे  राजू जमादार व शिवप्रेमी व नेसरी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment