दिव्यांग धावपटू किरणने चंदगडचे नाव जगात पोचवले - भरमूअण्णा पाटील, एशियन पॅरालिंपिकमधे जिंकले रौप्यपदक - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

दिव्यांग धावपटू किरणने चंदगडचे नाव जगात पोचवले - भरमूअण्णा पाटील, एशियन पॅरालिंपिकमधे जिंकले रौप्यपदक

दिव्यांग धावपटू किरणचा सत्कार करताना सभापती अनंत कांबळे, शेजारी भरमू पाटील व इतर.

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

         बसर्गे (ता. चंदगड) येथील दिव्यांग धावपटू किरण पाटील याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत रौप्य पदक पटकावून गाव, तालुक्यासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. असे गौरवोद्गार माजी रोहयो मंत्री भरमुअण्णा पाटील यांनी काढले. ते बसर्गे येथे दिव्यांग धावपटू किरण पाटील यांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  पंचायत समिती सभापती ॲड. अनंत कांबळे यांच्या हस्ते किरणचा सन्मान करण्यात आला.

             ग्रामपंचायत बसर्गे येथे झालेल्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाहू पाटील यांनी केले. एशियन ट्रॅक अँड टर्फ फेडरेशन च्या वतीने कोलंबो- श्रीलंका येथे झालेल्या 'आशिया पॅरालम्पिक गेम २०२१' स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून १०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकु शकतात. हे अपंग किरण ने दाखवून दिले. सत्कार प्रसंगी त्याला गावच्या वतीने पुढील वाटचालीसाठी आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी माजी सभापती जगन्नाथ हुलजी, शिक्षण विस्ताराधिकारी एम टी कांबळे, भरमू तारीहाकर, दयानंद कदम, इंद्रजीत होनगेकर, मुख्याध्यापक इंगवले आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. आभार शिल्पा तुर्केवाडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment