कल्याणपूरला आदिवासी वस्ती सुधार योजनेतून १५.६५ लाखांची विकास कामे - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

कल्याणपूरला आदिवासी वस्ती सुधार योजनेतून १५.६५ लाखांची विकास कामे

कल्याणपुर (ता. चंदगड) येथे आदिवासी विकास योजनेतील कामांचा शुभारंभ करताना कल्लाप्पा भोगण, सुप्रिया कांबळे, विलास पाटील यांच्यासह मान्यवर व आदिवासी बांधव.

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          महाराष्ट्र शासनाच्या सन २०२०-२१ मधील आदिवासी विकास निधीतून 'ठक्कर बाप्पा आदिवासी गट सुधार' योजनेंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत कागणी पैकी कल्याणपूर आदिवासी पाड्याच्या  पायाभूत विकासासाठी १५ लाख ६५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे आदिवासी पाड्यावरील महादेव कोळी  समाजातून समाधान व्यक्त होत आहे. या निधीतून होणाऱ्या गावातील रस्ते काँक्रिटीकरण, गटर आदी विकास कामांचा शुभारंभ जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी सरपंच  सुप्रिया कांबळे होत्या.

   १०० टक्के  महादेव कोळी आदिवासी जमातीचे वास्तव्य असलेल्या कल्याणपूर सारख्या दुर्गम गावाच्या विकासासाठी शासनाकडून पहिल्यांदाच मोठी रक्कम आल्यामुळे ग्रामस्थांत चैतन्य पसरले असून महाविकासआघाडी शासनाचे आदिवासी बांधवांनी आभार मानले. याप्रसंगी उपसरपंच रामचंद्र देसाई, पोलीस पाटील अमृतराव देसाई, विलास भावकू पाटील, ग्राम पं सदस्य अविनाश देसाई, गुंडोपंत देसाई, गोविंद कांबळे, राजेंद्र देसाई, सागर खाडे, महादेव पाटील, सुबराव पाटील, भरमाणा पाटील, जनार्दन देसाई, रामचंद्र व्हन्याळकर, विकास कांबळे, अशोक भोगन, अशोक कोळी  यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बी. एल. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment