पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची फित लावून शुभेच्छा देताना न्यायाधीश बिराजदार व पोलीस निरीक्षक तळेकर आदी |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
नूतन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यात चंदगड पोलीस ठाण्यातील पाच पोलिसांचा समावेश आहे. सेवाज्येष्ठतेनुसार ३० डिसेंबर रोजी पदोन्नतीचे आदेश व फित प्रदान करण्यात आली. चंदगड येथे दिवानी न्यायाधीश ए. सी. बिराजदार व पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या हस्ते फित लावून शुभेच्छा देण्यात आल्या.
पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांत महादेव जाधव पोलीस हवालदार पदावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक, जमीर मकानदार व उषा सुतार पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार, जयप्रकाश बेनके व नितीन डोंगरे यांची पोलीस कॉन्स्टेबल पदावरून पोलीस नाईक पदावर बढती झाली.
पदोन्नती प्रदान कार्यक्रम प्रसंगी चंदगड न्यायालय बार असोसिएशनचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment