तांबुळवाडी ते माणगाव रस्त्याची झालेली दुरावस्था. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तांबुळवाडी फाटा ते माणगाव या गावा दरम्यान जाणाऱ्या रस्तावर खड्ड्याचें साम्राज्य निर्माण झाले असून या खड्ड्यामुळे वाहन चालकांच्या कसरतीसोबत अपघाताची संख्या सुद्धा वाढत चालली आहे.
वस्तुस्थिती पाहता तांबुळवाडी फाट्यापासून ते माणगाव पर्यत जाणाऱ्या रस्तावर ठीकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळताहेत. यामुळे तांबूळवाडी, बागीलगे,डुक्कूरवाडी, माणगाव या गावांसह कडेला असणाऱ्या गावांतील नागरिकांचं जीवन अडकळीत बनल आहे.याबाबत डुक्कूरवाडी ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांनी बांधकाम विभागाकडे चौकशी केली असून याबाबत ताबडतोब एस्टीमेट करून डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे. मात्र या दरम्यान प्रथम रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.
बातमी सौजन्य - नंदकिशोर गावडे, नागनवाडी
No comments:
Post a Comment