गट साधन केंद्र चंदगड कडून दिव्यांग मुलांचे पालक, लिपिक यांची कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

31 December 2021

गट साधन केंद्र चंदगड कडून दिव्यांग मुलांचे पालक, लिपिक यांची कार्यशाळा संपन्न

लिपिक व पालक कार्यशाळेत एस.के. पाटील यांचे स्वागत करताना अमृत देसाई सोबत सुनिल पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

      पंचायत समिती चंदगडच्या गट समूह साधन केंद्राच्या वतीने चंदगड येथे इयत्ता १०वी १२ वी बोर्ड परिक्षेसंदर्भातील दिव्यांग विद्यार्थांच्या संदर्भात शाळेचे लिपिक व विद्यार्थी -विद्यार्थिनिंचे पालक यांची कार्यशाळा घेण्यात आली.

      प्रास्ताविक  बीआरसीचे सुनिल पाटील यानी केले . चंदगड तालूक्यातील दिव्यांग  विद्यार्थी शासनाच्या विविध सवलतीपासून वंचित राहू नये यासाठी पालक , शिक्षक व लिपीकानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सुनिल पाटील यानी सांगीतले . अमृत देसाई यानी दिव्यांग मुलांचे किती प्रकार आहेत , शाळेमध्ये अशी मुले कशी ओळखावित , अशा मुलांसाठी शासनाच्या कोण कोणत्या विशेष योजना आहेत याची सविस्तर माहिती दिली . याच बरोबर प्रस्तावासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याचेही मार्गदर्शन केले . या कार्यशाळेत अशा विद्यार्थ्याना कोणत्या सुविधा पुरवता येतील या संदर्भात विचार विनिमय करण्यात आला .पालक व लिपिकानी विविध प्रश्न उपस्थित करून शंकाचे निरसन करुन घेतले . यावेळी शासनाच्या पवित्र पोर्टल संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन बीआरसीचे अमित चौगुले यानी केले . या कार्यशाळेला  बीआरसीचे दिलीप कदम , सौ . स्वाती चौगुले लिपिक संजय पाटील , एस .के. पाटील , सचिन नेसरीकर , एस .के. नार्वेकर , श्री कुडीत्रेकर यांच्यासह तालूक्यातील विविध शाळातील लिपिक व विद्यार्थी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन महादेव नाईक यांनी केले तर आभार एस.के. पाटील यानी मानले .

No comments:

Post a Comment