कोवाड महाविद्यालयात योग आणि मूल्यशिक्षण कार्यक्रम संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2021

कोवाड महाविद्यालयात योग आणि मूल्यशिक्षण कार्यक्रम संपन्न

 कोवाड महाविघालयात योग प्रात्यक्षिक करताना गायत्री बिर्जे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

           कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथील योग आणि मूल्यशिक्षण विभागाच्या वतीने  महाविद्यालयात  योग प्राणायमाचे मानवी जीवनात महत्व याविषयावर व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी  प्र. प्राचार्य डॉ. व्ही. आर पाटील, प्रमुख वक्ते  प्रा. डॉ. ए. एस. आरबोळे आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी उपस्थित असलेली विद्यार्थिनी कु. गायत्री मारुती  बिर्जे  उपस्थित होती. प्रास्ताविकात प्रा. डॉ. बी. एस. पाटील यांनी योग आणि प्राणायाम याचे स्वरूप विशद केले. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ. ए. एस. आरबोळे यांनी  योगा, प्राणायम यांचे महत्त्व विविध उदाहरणातून दिले.

     डॉ. पाटील यावेळी बोलताना म्हणाले योग ही   जिवनाची  गुरुकिल्ली आहे.त्यात प्राणायम हे स्वासावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.  त्यात त्रिसूत्री खूप महत्वाची आहे.

व्याख्यानानंतर कु. गायत्री  बिर्जे यांनी योगा आणि प्राणायमची प्रात्यक्षीके सादर केली.अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनी योग आणि प्राणायमाचे  महत्व  स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी याच काळात स्वतःहून  योग आणि मूल्यशिक्षनाचा  अंगीकर केल्यास  आयुष्य सुंदर होईल असे विचार व्यक्त केले . 

यावेळी प्रा. डॉ. ए. के. कांबळे, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. के. एस. काळे, प्रा. एन. पी. महागांवकर, डॉ. के. पी. वाघमारे, डॉ. सदानंद गावडे, प्रा. शिवानंद शिद्दगोंड, डॉ. सुनीता कांबळे, प्रा. प्रियंका कांबळे, प्रा. प्रभा पवार हे उपस्थित  होते. आभार डॉ. एस. बी. पाटील यांनी तर सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले.

No comments:

Post a Comment