व्यवसायातील नवनवीन संधीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याची गरज - प्रा. एस. डी. गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

16 December 2021

व्यवसायातील नवनवीन संधीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याची गरज - प्रा. एस. डी. गावडे

चंदगड येथील माडखोलकर महाविद्यालयातील अकॉटन्सी विभागामार्फत आयोजित केलेल्या उद्योजकता विकास मार्गदर्शन वर्गात बोलताना प्रा. एस. डी. गावडे, शेजारी प्रा. एस. के. सावंत, समोर विद्यार्थ्यी.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             आजच्या गतीमान युगात प्रत्येकालाच व्यक्तिमत्व विकासाला वाव आहे. नोक-यांची घटती संख्या विचारात घेऊन व्यवसायातील नवनवीन संधीकडे सकारात्मक दृष्टिने पाहण्याची गरज आहे. आपले ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास निश्चितच आपण यशस्वी उद्योजक बनू शकतो असे प्रतिपादन प्रा. एस. डी. गावडे यांनी केले. ते र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील अकॉटन्सी विभागामार्फत आयोजित केलेल्या उद्योजकता विकास मार्गदर्शन वर्गात बोलत होते. अध्यक्षस्थानी अकौंटन्सी विभागप्रमुख प्रा. एस. के. सावंत होते.

          ते पुढे म्हणाले व्यवसाय वृध्दींगत करण्यासाठी सरकारी अनुदान मिळते. सरकारी योजनाचा अभ्यास करून त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी व्यवसायातील चढउतारांना सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले व स्वानुभव कथन केले.

       अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. एस. के. सावंत यांनी व्यवसाय वृध्दीसाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम व सकारात्मक दृष्टी आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. व्यावसायिक कौशल्ये आत्मसाता भविष्यकाळात येणा-या अडचणींचा मुकाबला करण्याचे सामर्थ प्राप्त होते. प्रा. श्रीमती पी. सी. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ए. डी. कांबळे यांनी आभार मानले. रोहन यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. 

No comments:

Post a Comment