प्रिन्स पाईप कंपनी प्रशासनाबाबत कामगारात असंतोष, कामगारांना कामावरून काढून टाकल्याने आंदोलन - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2021

प्रिन्स पाईप कंपनी प्रशासनाबाबत कामगारात असंतोष, कामगारांना कामावरून काढून टाकल्याने आंदोलन

 


चंदगड /प्रतिनिधी

      शिनोळी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीतील  देवरवाडी रस्त्यावर असणाऱ्या प्रिन्स पाईप कंपनीच्या प्रशासनाने कामगारांना कोणतीच पूर्व कल्पना न देता कामावर हजर न राहण्याचे आदेश दिले. याबाबत जाब विचारायला गेलेल्या कामगारांना आणि सामाजिक कार्यकर्ते यांना अरेरावीची भाषा करत आम्ही तुमच्याशी चर्चा करणार नाही असे गेटवर सांगण्यात आले असता संतप्त कार्यकर्त्यांनी जोपर्यंत कंपनी मालक चर्चेला येणार नाहीत तोपर्यंत कंपनीमध्ये कोणी आता जाणार नाही कोणी बाहेर येणार नाही, असा पवित्रा घेत कंपनी गेटवर ठिय्या मारला .यावेळी प्रशासनाचा निषेध करत कंपनी प्रशासनाची अरेरावी खपवून घेणार नाही असे सांगितले.

    यावेळी ॲड. संतोष मळविकर, डॉ. एन. टी. मुरकुटे, दिवाकर पाटील, प्रताप डसके यांच्या नेतृत्वाखाली हा ईशारा देण्यात आला.

      यावेळी ॲड. संतोष मळविकर यांनी जोपर्यंत मालक आणि प्रशासन चर्चेला येत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असे सांगितले. आपण केवळ चर्चेला आलो होतो पण कंपनी प्रशासनाने अरेरावी करत असल्याबद्दल खंत व्यक्त केली. यानंतर चंदगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश गणेशकर यांनी घटनास्थळी येऊन प्रशासन व आंदोलक यांच्यात चर्चा घडवून आणली. यावेळी स्थानिक कामगारांनी प्रशासन कामगारांना कोणत्या पद्धतीची वागणूक देतंय याविषयी सांगितले. यावेळी कंपनी प्रशासनाचे अधिकारी प्रदीप माने आनंदा पोटले हे चर्चेसाठी उपस्थित होते.

    यावेळी माने यांनी  कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश हेगडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून दिला. असता येत्या १४ डिसेंबर रोजी आपण हजर राहू त्यावेळी चर्चा करू असे सांगितले व कामावरून कमी केलेल्या कामगारांचा पगार हि देऊ असे आश्वासन दिले. त्यामुळे आता १४ डिसेंबर रोजी काय निर्णय होणार याबाबत उत्सुकता लागली आहे.

   यावेळी अविनाश पाटील, अमर कांबळे, नितेश नाईक, सचिन गुरव अनिकेत पाटील राजाराम गोंधळी आदी उपस्थित होते.

     प्रशासन नरमले

सुरवातीला चर्चेला गेले असता प्रशासनाणे आंदोलकांना मज्जाव केला चर्चेला असमर्थता दर्शवली पण ठिय्या आंदोलन केले असता आणि काही गोष्टींचा उलघडा झाला असता प्रशासन नरमले.



तालुका आधारभूत किमतीवर धन,भात खरेदी केंद्र सूरू, शेतकऱ्यांनी ३१ डिंसेबर पर्यंत सहभाग नोंदवावा 

चंदगड/प्रतिनिधी :-- तुतुर्केवाडी (यशवंतनगर) येथील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत हंगाम सन २०२१-२२ करीता शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत धान, भात खरेदी योजना सुरु असून शेतकऱ्यांनी आपली नावे संघाचे यशवंतनगर येथील मुख्य कार्यालयात नोंदवावीत करावीत असे आवाहन व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी केले आहे.

     धान खरेदी पोर्टलवर दि. ३० नोव्हेंबर २०२१ ही नोंदणी करण्यासाठीची अखेरची मुदत होती. ती शासनाने परत एक महिना वाढवली असून आता दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नोंदणी मुदतवाढ दिलेली आहे. तसेच या मुदतीनंतर नोंदणी करण्यात येणार नसल्याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी व आपले धान भाताची जास्तीत जास्त नोंदी कराव्यात. तसेच मागील हंगामातील चुकीचे सातबारा, खाडाखोड केलेले व आठ अ चे उतारे घेऊन नोंदणी केली जाणार नाही.आधारभूत किंमत धान खरेदी पोर्टलवर नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांनी चालू हंगाम २०२१-२२ या सालातील धान (भात) पिकाची लागवड असलेला ऑनलाईन सातबारा व आठ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी केले आहे


No comments:

Post a Comment