तालुका संघामार्फत आधारभूत किमतीवर धान, भात खरेदी केंद्र सूरू, शेतकऱ्यांनी ३१ डिंसेबर पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

09 December 2021

तालुका संघामार्फत आधारभूत किमतीवर धान, भात खरेदी केंद्र सूरू, शेतकऱ्यांनी ३१ डिंसेबर पर्यंत सहभाग नोंदविण्याचे आवाहन


चंदगड/प्रतिनिधी

तुर्केवाडी (यशवंतनगर) येथील चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघामार्फत हंगाम सन २०२१-२२ करीता शेतकऱ्यांसाठी आधारभूत किंमत धान, भात खरेदी योजना सुरु असून शेतकऱ्यांनी आपली नावे संघाचे यशवंतनगर येथील मुख्य कार्यालयात नोंदवावीत करावीत असे आवाहन व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी केले आहे.

     धान खरेदी पोर्टलवर दि. ३० नोव्हेंबर २०२१ ही नोंदणी करण्यासाठीची अखेरची मुदत होती. ती शासनाने परत एक महिना वाढवली असून आता दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत नोंदणी मुदतवाढ दिलेली आहे. तसेच या मुदतीनंतर नोंदणी करण्यात येणार नसल्याची सर्व शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी व आपले धान भाताची जास्तीत जास्त नोंदी कराव्यात. तसेच मागील हंगामातील चुकीचे सातबारा, खाडाखोड केलेले व आठ अ चे उतारे घेऊन नोंदणी केली जाणार नाही.आधारभूत किंमत धान खरेदी पोर्टलवर नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांनी चालू हंगाम २०२१-२२ या सालातील धान (भात) पिकाची लागवड असलेला ऑनलाईन सातबारा व आठ अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स आदी कागदपत्रांची पूर्तता करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार राजेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment