जवारी लाल मिरचीचा तडका चालु हंगामातील उच्चांकी दर - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2021

जवारी लाल मिरचीचा तडका चालु हंगामातील उच्चांकी दर

गडहिंग्लज येथील कृषिउत्पन्न बाजार समिती मध्थे मिरचीचा सौदा करताना व्यापारी व शेतकरी

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सिमेलगत असलेली गडहिंग्लज कृषि उत्पन्न बाजार समिती ही पुर्वी पासुनच मिरची करीता प्रसिध्द आहे. सद्या मिरची हंगाम जोरात सुरू आहे. गडहिंग्लज मुख्य बाजार आवारामध्ये एस. एस. मोर्ती यांच्या दुकानात आवक झालेली जवारी मिरची उत्पादक शेतकरी  तानाजी भैरु कोकीतकर व सौ. चंद्रभागा मारूती आजगेकर (रा. सुळे ता. आजरा) यांच्या जवारी मिरचीला चालु हंगामातील रु. ९ ०,१०० प्रति क्विंटल असा उच्चांकी दर मिळाला आहे.

       सदरची मिरची खरेदीदार जावेद मुगळी यांनी खरेदी केली. आजरोजी एकुण ५६२ पोती मिरची आवक विक्री होवून किमान रुपये ६००० ते कमाल ९ ०,१०० पर्यंत दरदाम झाले. यावेळी सौदया करीता व्यापारी रोहीत मांडेकर, अरविंद आजरी, महेश मोर्ती, बी. पी. शहा, व्ही. के. चाथे, राजन जाधव, शिवानंद मुसळे, श्रीकांत येरटे, बी. एस. पाटील, अमर मोर्ती,  कयुम बागवान, जब्बार बागवान, संजय खोत, मुन्ना बागवान, जफीर बागवान, अस्लम बागवान तसेच समितीचे सौदा लिपीक  शैलेश देसाई उपस्थित होते.

No comments:

Post a Comment