कोवाड येथे तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2021

कोवाड येथे तीन दिवस धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

         कोवाड (ता. चंदगड) येथे श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार, वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रम रविवार दि. १९ ते मंगळवार दि. २१ डिसेंबर २०२१ अखेर संपन्न होणार आहे.

         कोवाड येथे श्री लक्ष्मी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून लक्ष्मी देवीचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १९ रोजी सकाळी ८ वाजता मूर्तिपूजा व मिरवणूक, दुपारी ३ वाजता वास्तुशांती व होमहवन, सायंकाळी ६ नंतर भजन व जागर.

          सोमवार दिनांक २० रोजी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत मूर्ती प्रतिष्ठापना, कळसारोहण, पूर्णाहुती, नैवेद्य व आरती, सायंकाळी ४ नंतर नैवेद्य व ओटी भरणे, भजन व जागर, रात्री ९ वाजता गोंधळ कार्यक्रम.

               मंगळवार दिनांक २१ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत नैवेद्य व ओटी भरणे कार्यक्रम, सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत महाप्रसाद, दुपारी २ नंतर भजन तर रात्री ९ वाजता ज्योतिर्लिंग भजनी मंडळ कोवाड यांचे सोंगी भजन; असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. गाव व परिसरातील भाविकांनी कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मी मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत कोवाड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment