आनंदी जीवनासाठी विद्यार्थीदशेतच कला जोपासणे आवश्यक - डॉ. सुजित मिणचेकर, महागाव अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2021

आनंदी जीवनासाठी विद्यार्थीदशेतच कला जोपासणे आवश्यक - डॉ. सुजित मिणचेकर, महागाव अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा महोत्सव

महागाव येथे आयोजित शिवाजी विद्यापिठाचे मध्यवर्ती युवा महोत्सवाचे शुभारंभ डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. एस. एच. सावंत, डॉ. आर. व्हि. गुरव, शशिकांत पाटील-चुयेकर, ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. डी. जी. चिघळीकर व इतर मान्यवर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       संत गजानन मध्ये शिवाजी विद्यापीठाचा ४१ वा मध्यवर्ती  युवा महोत्सवाचे उद्घाटन "विद्यार्थीदशेतच अभ्यासाबरोबर कोणतीही कला जोपासणे आनंदी जीवनासाठी अत्यावश्यक असते. आपल्यातील कौशल्य व मिळणारा वाव यांची योग्य ती सांगड घालून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेले युवा महोत्सवाचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे आहे. असे विचार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित मध्यवर्ती  युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आण्णासाहेब चव्हाण हे होते.  

        या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत यांनी करून युवा महोत्सवात सहभागी सर्व स्पर्धकांचे स्वागत केले. आमदार मिणचेकर यांनी आपल्या महाविद्यालयीन काळात आठवणींना उजाळा देत स्वतःच्या सहभागाबद्दल सांगून "मेरे रशके कमर" हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यापिठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर. व्हि. गुरव, डॉ. यशवंत चव्हाण, गटविकास अधिकारी शरद मगर यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

        उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांनी समूहगीत,मूकनाट्य, नकला, लोककला, गायन, पथनाट्य, वाद-विवाद, मेहंदी, रांगोळी, प्रश्नमंजुषा, लघुनाटिका, एकपात्री अभियान,वाद विवाद यांचे सादरीकरण केले या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यानी भरभरून दाद दिली.

        यावेळी गटविकास अधिकारी शरद मगर, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, प्रा. व्हि. एन. पाटील, डॉ. डी. जी. चिघळीकर, प्रा. टी. के. करीकट्टी, डॉ. व्हि. वाय. कदम, डॉ. एस. जी. किल्लेदार, डॉ. मंगल मोरबाळे सह विद्यापिठ कार्यक्षेत्रातील  विद्यार्थी,  शिक्षकांची उपस्थिती होती.

                 पारंपारिक महाराष्ट्रीय लोक नृत्याला दाद

          यावेळी युवा महोत्सवातील पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी भारुड, गोंधळ, जागर यासह इतर  लोकनृत्य ताकदीने सादर केले. यामध्ये पारंपारिक महाराष्ट्रीय लोक नृत्याला टाळ्या व शिट्याच्या  गजरात दाद दिली. यामुळे कलाकार विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व युवा वर्गात चैतन्य निर्माण झाला होता.

         कोरोना नियमांचे पालन

          या महोत्सवात शासनाने सांगितले कोरोना नियमांचे पालन करीत दोन्ही लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांची नावनोदंणी करुन प्रवेश देत होता.

No comments:

Post a Comment