निट्टूर येथील भावेश्वरी यात्रा रद्द, ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीचा निर्णय - चंदगड लाईव्ह न्युज

15 December 2021

निट्टूर येथील भावेश्वरी यात्रा रद्द, ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ग्रामपंचायतीचा निर्णय


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

     कोरोना महामारी व ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील निट्टूर (ता. चंदगड) येथे होणारी भावेश्वरी यात्रा यंदा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे.

   कोरोना महामारी व आत्ता नव्याने जगाला भेडसावत असलेल्या 'ओमियक्रॉंन' नावाचा कोरोना व्हेरीएन्ट सर्वत्र पसरू लागल्याने सावधानता बाळगण्यासाठी तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी निट्टूर (ता.चंदगड) ग्रामपंचायत, कोरोना कमिटी, तंटामुक्त कमिटी, भावेश्वरी देवस्थान कमिटी यांनी मंगळवार व बुधवार दि. २१ व २२ रोजी होणारी भावेश्वरी यात्रा रद्द करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी परिसरातील तसेच तालुक्यातील भाविकांनी याची नोंद घेवून या दरम्यान यात्रेसाठी येवू नये. तसेच या महामारीचा प्रसार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी करावी असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.No comments:

Post a Comment