शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात, तीन महाविद्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला सुरुवात, तीन महाविद्यालयांतील कर्मचारी संपात सहभागी

हलकर्णी ता.चंदगड येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांसाठ संपात सहभागी झाले.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         सेवांतर्गत आश्वासीत प्रगत योजना पूर्वलक्षी प्रभावाने पूनरजीवीत करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरु करावी, यासह १३ प्रमुख प्रलंबीत मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

          या संपा चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी, आर्टस सायन्स कॉलेज कोवाड, र. भा. माडखोलकर कॉलेज चंदगड या महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या संपात आपला सहभाग नोंदवला आहे.

          हे आंदोलन संस्था किंवा प्राचार्यांच्या विरोधात नाही, विद्यार्थी हिताचा विचार करून सदरचे आंदोलन कित्येक दिवस सनदशीर मार्गाने सुरु आहे. एक महिन्यापूर्वी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी एक दिवसाचे लाक्षणीक कामबंद आंदोलन, त्यानंतर काळ्या फीती लावून आंदोलन करून शासनाला जाग आणण्याचे प्रयत्न झाले. परंतु वाढत्या महागाईने तुटपुंज्या पगारावर काम करणारा कर्मचारी वर्ग बेजार झाला आहे. लोकशाही मार्गाने सुरु असलेल्या आंदोलनाची दखल शासन दरबारी घेतली जात नसलेने आपल्या न्याय्य मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर कामबंद आंदोलना शिवाय पर्याय नाही. अशी कर्मचाऱ्यांची भावना झाली असलेने हे आंदोलन लादले जात असल्याचे मत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment