किरणचे श्रीलंकेतील पदक चंदगड तालुकातील युवकांना प्रेरणादायी - माजीमंत्री भरमूआण्णा पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

22 December 2021

किरणचे श्रीलंकेतील पदक चंदगड तालुकातील युवकांना प्रेरणादायी - माजीमंत्री भरमूआण्णा पाटील

श्रीलंकेत पदक विजेत्या किरणची गावातून मिरवणुक काढताना ग्रामस्थ.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        किरणने प्रतिकूल परिस्थितीत श्रीलंकेत मिळवलेले पदक गावासाठी भूषणावह बाब असून त्याचे यश चंदगड तालुक्यातील युवकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे मनोगत माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी काढले. ते बसर्गे (ता. चंदगड) येथे कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवलेल्य किरण पाटील याच्या यशाबद्दल आयोजित सत्कार कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

किरणचा सत्कार करताना माजी राज्यमंत्री भरमु पाटील

        प्रास्ताविक दयानंद पाटील यांनी केले. यावेळी किरण पाटील श्रीलंकेतील कोलंबो येथे एशियन ट्रक अँड टर्फ फेडरेशन, इंटरनँशनल आणि श्रीलंका एशियन ट्रक अँड टर्फ फेडरेशनच्या स्पर्धेत १०० मीटर व ४०० मीटर धावणे स्पर्धेत रौप्य पदक मिळविल्याने बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर महिलांनी किरणचे औक्षण केले. 

         शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. पाटील यांनी किरणला शुभेच्छा देताना त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी आपली शिक्षण संस्था करेल असे जाहीर केले. तसेच माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी रोख पाच हजार तर मारुती कुट्रे यांनी एक हजार दिले. तसेच भरमूआण्णा पाटील फाऊंडेशनकडूनही किरण मदत जाहीर करण्यात आली. यावेळी सरपंच तुकाराम कांबळे, उपसरपंच सागर गुरव, सोसायटी अध्यक्ष मारुती कुट्रे,उपाध्यक्ष हरीभाऊ पाटील, निंगाप्पा कलखांबकर, लक्ष्मण पाटील, परशराम पाटील, सुषमा पाटील, ज्योतीताई पाटील, पोलीस पाटील, वैष्णवी कलखांबकर, राम पाटील, दशरथ पाटील, निव्रूत्ती पाटील, खरूजकर उपस्थित होते. सेक्रेटरी रामू पाटील यांनी आभार मानले. 


     एक भाजी विक्रेता ते आंतरराष्ट्रीय धावपटटू : किरण पाटील

         चंदगड सारख्या ग्रामीण भागात राहून किरण पाटील तरुण एक वेळच्या जेवणासाठी भाजी विकणारा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये एशियन ट्रक अँड टर्फ फेडरेशन, इंटरनॅशनल आणि श्रीलंका एशियन ट्रक अँड टर्फफ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, दिनांक १७ ते १९ डिसेंबर या कालवधीमध्ये श्रीलंकेतील कोलोंबो येथे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल पॅरा स्पर्धेत १०० मी आणि ४०० मी धावणे स्पर्धेत सिल्वर मेडल यशस्वीरीत्या मिळवले आहे. 

No comments:

Post a Comment