श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे करिअर मार्गदर्शन व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2021

श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे करिअर मार्गदर्शन व ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा

ताणतणाव व्यवस्थापन व व्यवसाय कार्यशाळेला उपस्थित असणारे तज्ञ मार्गदर्शक एस .बी. पाटील यांचे स्वागत करताना प्राचार्य व्ही . एन . सुर्यवंशी

अडकूर / सी. एल. वृत्तसेवा

       कोल्हापूर जिल्हा प्रशिक्षण संस्था व पंचायत समिती चंदगड यांच्या वातीने श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज अडकूर (ता. चंदगड) येथे करिअर मार्गदर्शन, ताणतणाव व्यवस्थापन व महापोर्टल या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी होते.

                                                                        जाहिरात

जाहिरात

        यावेळी गड़हिंग्लज येथील बसर्गै हायस्कूलचे अध्यापक एस. बी. पाटील, चंदगड बी. आर. सी.  चे.  एस. ए. नाईक मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. ताणावाशिवाय जीवन नाही पण तणाव कमी करणे आपल्या हातात आहे. योग्य नियोजन, वेळेचे भान, योग्य अभ्यासाच्या सवयी आत्मसात केल्या तर ताणतणाव मुक्त जीवन जगता येते .विद्यार्थ्यानी तणाव न घेता आलेल्या संकटांशी धैर्याने सामोरे गेल्यास जीवनात यशस्वी होता येथे, असे विचार प्रमुख मार्गदर्शक एस. बी. पाटील यानी व्यक्त केले. यावेळी प्राचार्य व्ही. एन. सुर्यवंशी, एस. ए. नाईक यानीही मार्गदर्शन केले.

        या कार्यशाळेला एस. के. पाटील, आय. वाय. गावडे, एम. पी. पाटील, बंकट दिशेबकर, एस. डी. पाटील आदी मान्यवर व हायस्कूलमधील इयत्ता १० वी, ११ वी व १२ वीचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक एस. एन. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन जे. व्ही. कांबळे यांनी केले तर आभार आय. वाय. गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment