स्वप्नीलला किडणी प्रत्यारोपणसाठी हवी आर्थिक मदत.....मुलाला आई देणार आपली किडणी... - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2021

स्वप्नीलला किडणी प्रत्यारोपणसाठी हवी आर्थिक मदत.....मुलाला आई देणार आपली किडणी...

स्वप्निल नरसू निर्मळकर

तेऊरवाडी / एस. के. पाटील

            नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील स्वप्निल नरसू निर्मळकर हा २८ वर्षीय तरुण किडणीच्या विकाराने त्रस्त  असून गेली चार-पाच वर्षे तो आजाराशी झुंज देतोय. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात आठवड्याला दोन दिवस डायलेसिस असे उपचार सुरू आहेत. आपल्या मुलाचे होणारे हाल पाहून आईने मुलाला आपली  एक किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण गरज आहे ती किडणी प्रत्यारोपण करण्यासाठी येणाऱ्या वैद्यकीय खर्चाची.

           स्वप्नीलचे वडील निवृत्त शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. स्वप्नीलच्या मोठा भाऊ मुबई येथे साध्या कामावर आहे. दरम्यानच्या चार पाच वर्षाच्या काळात वैद्यकीय उपचार करत असताना या निर्मलकर कुटुंबाला खूपच आर्थिक खर्च करावा लागला. आता आईने आपली किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. एका खासगी दवाखान्यात  किडणीप्रत्यारोपण  होणार आहे. त्यासाठीच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता कुटुंबाकडून होत आहेत.

            पण किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी दहा ते बारा  लाखचा खर्च येणार आहे. स्वप्नीलच्या उपचाराकरिता बरीच रक्कम निर्मळकर कुटुंबाने याआधी केली आहे. घरात कोणीही कमावते नाही. कुटुंबाचा दैनंदिन खर्च व दवाखाना याकरिता निर्मळकर कुटुंबाला यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामूळे आता त्यांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्याच्या वर्गमित्रासह काही दानशूर मंडळीनी मदतीचा हात दिला आहे. पण ही मदत खर्चाच्या मानाने कमी आहे. तर उपचाराकरिता येणारा खर्च मोठा आहे. त्यासाठी या कुटुंबाला भरीव अशी मदत होणे गरजेचे आहे. 

           किडणी प्रत्यारोपण चे मुलावर चांगले उपचार होतील व पुन्हा चांगले दिवस पाहता येतील या आशेवर हे कुटुंब जगत आहे. पण याकरिता आता खरी गरज आहे किडणी प्रत्यारोपण करण्यासाठीं येणाऱ्या  खर्चाची. त्यासाठी सेवाभावी संस्था व दनाशुर मंडळीनी पुढे येणे गरजेचे आहे. उदार अंतःकरणाने ज्यांना शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.


* मदतीसाठीचा खाते क्रमांक *

नाव - स्वप्निल नरसू निर्मळकर

खाते नं. - 093110110007889

बँक ऑफ इंडिया शाखा नेसरी

IFSC code - BKID0000931

अधिक माहितीसाठी संपर्क...

रविंद्र हिडदुगी.

(सामाजिक कार्यकर्ते नेसरी)

मोबा.नं. 8007328158

No comments:

Post a Comment