कागदपत्रात खाडाखोड करून जमिन हडप करण्याचा प्रयत्न, चंदगड तहसील रेकॉर्ड कार्यालयातील प्रकार उघडकीस, तिघांवर गुन्हा दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2021

कागदपत्रात खाडाखोड करून जमिन हडप करण्याचा प्रयत्न, चंदगड तहसील रेकॉर्ड कार्यालयातील प्रकार उघडकीस, तिघांवर गुन्हा दाखल

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड तहसील कार्यालयातील (जुन्या दस्त विभाग) रेकॉर्ड कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या मदतीने मलगेवाडी (ता. चंदगड) येथील एका शेतकऱ्याची जमिन कागदपत्रात खाडाखोड करून दुसर्‍याच शेतकऱ्याच्या नावावर करून जमिन हडप करण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी चंदगड न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रेकॉर्ड विभागातील अनोगोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

           या प्रकरणी चंद्रकांत विठोबा चिलगोंडे यांच्या फिर्यादिवरून रेकॉर्ड विभागातील सुरेश गणपती कळेकर (वय ५५, ब्राह्मण गल्ली, चंदगड) याच्यासह प्रविण गणपती गुडवळेकर (वय ३८) व नारायण लक्ष्मण गुडवळेकर (वय ७४, दोघेही रा. बोजुर्डी, ता. चंगदड) यांच्याविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की मलगेवाडी येथील रहिवासी चंद्रकांत विठोबा चिलगोंडे यांची मलगेवाडी येथील जुना सर्व्हे नं. २७ रिवीजन नं.३८/२ ही जमीन सरकारी हक्काची मिळकत असून कुळ म्हणून संतू यशवंत गावडा (रा.बोजुर्डी) व पूर्व हक्कदार आप्पा सोनबा चिलगोंडे (रा. मलगेवाडी) यांच्या ताब्यात १९५६-५७ पासून होती. अप्पा चिलगोंडे यांचा १९८६ ला मृत्यू झाल्यावर वारस म्हणून चंद्रकांत चिलगोंडे यांचे नाव लागले व ती जमीन ते आजतागायत कसत आहेत. असे असताना बोंजुर्डी येथील प्रविण गणपती गुडवळेकर व नारायण लक्ष्मण गुडवळेकर या दोघांनी तहसीलदार कार्यालयातील रेकॉर्ड विभागाचा कार्यभार सांभाळणारे सुरेश गणपती कळेकर व कार्यालयातील इतरांच्या सहाय्याने गट नं. २७ मधील कागदपत्रांत खाडाखोड करून चुकीचे रेकॉर्ड तयार करून प्रवीण गुडवळेकर व नारायण गुडवळेकर यांच्या नावाने मालक म्हणून नोंद केली असल्याची फिर्याद चिलगोंडे यांनी चंदगड न्यायालयात दाखल केली होती.

No comments:

Post a Comment