चंदगड येथील जि प च्या बांधकाम विभागप्रमुख पदी अभियंता मुल्ला रूजू - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2021

चंदगड येथील जि प च्या बांधकाम विभागप्रमुख पदी अभियंता मुल्ला रूजू

चंदगड : येथील जि. प. बांधकाम विभाग प्रमुख ई. ए. मुल्ला यांना पुष्प देऊन शुभेच्छा देताना कर्मचारी वर्ग.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड येथील जिल्हा परिषदेच्या  बांधकाम विभागाच्या प्रमुखपदी ई. ए. मुल्ला यांची नियुक्ती झाली असून काल त्यांनी पदभार स्विकारला. उपविभागीय अभियंता ई. ए. मुल्ला हे चंदगड येथील रहिवाशी असून त्यांना जन्मभूमीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी -२ या पदावर सात वर्षे उल्लेखनीय काम केलेले आहे. मूळचे चंदगड तालुक्यातील असल्यामुळे तालुक्यातील रस्त्यांसह अन्य प्रश्नांचा त्यांना अभ्यास आहे. पावसाळ्यात तिलारी घाटातील रस्ता दुरुस्ती व पारगड-मिरवेल-मोर्ले रस्त्यापर्यंत पारगड ग्रामस्थांनी पुकारलेल्या अंदोलनात घेतलेली भुमिका महत्त्वपूर्ण ठरली होती. त्यांच्या अनुभवाचा तालुक्याला लाभ होणार आहे कनिष्ठ अभियंता एस. टी. जाधव, पी. एन. देसाई, आर. आर. काकतकर, व्ही. ई. पाटील, सी. जी. करजगी, एम. वाय. नाईक आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment