पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे श्री देव वैजनाथ शिक्षक पतसंस्थेमार्फत आयोजित गुणगौरव सोहळ्यात बोलताना आम. राजेश पाटील, बाजूला अध्यक्ष तारिहाळकर, उपाध्यक्ष मोटर, पाटील वरुटे, जोशिलकर, हुद्दार आदी.
नंदकुमार ढेरे - चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
तालुक्यात अनेक संस्था स्थापन झाल्या. पण सलग पाच वर्षे १४ टक्के लाभांश वाटत ३५ लाखांपर्यंत एका कर्जदाराला कर्ज उपलब्ध करून देत ८ कोटींच्या ठेवी व तितकेच कर्ज वितरण करत नावलौकिक मिळवून समाजाला अभिमान वाटावा असे पारदर्शी कार्य संस्थेच्या माध्यमातून शिक्षक संघ परिवार करत आहे, असे गौरवोद्गार आम.राजेश पाटील यांनी काढले.
शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी राज्यस्तरापासून तालुका स्तरापर्यंत कामाच्या माध्यमातून शिक्षक संघ सामान्य शिक्षकांपर्यंत पोहोचलेला आहे,रुजलेला आहे. जुनी पेन्शन योजना शिक्षकांना लागू होण्यासाठी आपण आग्रही असल्याचे सांगितले. चंदगड तालुका शिक्षक संघाचा बालेकिल्ला असून कार्यकारिणीच्या कामामुळे मजबूत बांधणीमुळे शिक्षक संघ स्वबळावर कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणूक जिंकणार असल्याचे सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक,जिल्हा परिषद कोल्हापूर आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सभासद,विविध फाउंडेशन मार्फत पुरस्कार प्राप्त शिक्षक याचबरोबर पारगड प्राथमिक शिक्षक पतसंस्थेकडे निवड झालेल्या नूतन संचालकांचा सत्कार आमदार राजेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शिक्षक पतसंस्था सभासद कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहत कोरोनामुळे दिवंगत झालेल्या संस्थेचे सभासद कै.राजेंद्र तुपे व कै.विठोबा पाटील यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये संस्थेमार्फत देण्यात आले.इयत्ता पाचवी-इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी,इयत्ता पाचवी नवोदय विद्यालय निवड विद्यार्थी, इयत्ता चौथी व सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत यशस्वी विद्यार्थी, इयत्ता दहावी-बारावी परीक्षेत यशस्वी सभासदांच्या पाल्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.शिक्षक बॅकेचे संचालक शिवाजी पाटील ,अध्यक्ष रमेश हुद्दार, वसंत जोशिलकर , सरचिटणीस दस्तगीर उस्ताद,विद्यमान चेअरमन भरमु तारिहाळकर,व्हाईस चेअरमन अनंत मोटर व सर्व संचालक मंडळाचे यावेळी कौतुक करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी बापट ,प्राथमिक शिक्षक बँकेचे अध्यक्ष अण्णासो शिरगावे ,वसंत जोशिलकर शामराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केली.यावेळी शिक्षक बँकेचे उपाध्यक्ष बाजीराव कांबळे ,माजी चेअरमन बजरंग लगारे ,प्रशांत पोतदार ,शेख सर ,गडहिग्लज तालुका अध्यक्ष मांडेकर ,पाथरवट , सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्ष शि. ल. होनगेकर ,दस्तगीर उस्ताद ,जिल्हा उपाध्यक्ष टी जे पाटील , सदानंद पाटील ,पदवीधर अध्यक्ष अशोक नौकुडकर, सरचिटणीस अशोक भोईटे ,डी सी पी एस संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम नाईक ,विमुक्त शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजी चाळुचे , मुख्याध्यापक संघटनेचे रामचंद्र मोटूरे यासह सर्व संचालक मंडळ व सल्लागार, सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन सट्टूपा फडके, संजय गावडे यांनी केले तर उपाध्यक्ष अनंत मोटर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment