कोवाड महाविद्यालयात ओरिएंटेशन प्रोग्राम आणि स्वागत समारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

14 December 2021

कोवाड महाविद्यालयात ओरिएंटेशन प्रोग्राम आणि स्वागत समारंभ

कोवाड महाविद्यालयात ओरिएंटेशन प्रोग्राम आणि स्वागत समारंभ पार पडला.


तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       कोवाड (ता. चंदगड) येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने रिंटेशन आणि नवागत विध्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य व्ही. आर. पाटील होते. 

       प्रारंभी  उपस्थितांचे शब्दरुपी सुमनाने  स्वागत आणि प्रस्ताविक डॉ. आर. डी. कांबळे यांनी केले. त्यानंतर नवागत बी. ए,. बी. कॉम. भाग एक च्या सर्व विद्यार्थीं - विद्यार्थींनीचे पुष्प, देऊन स्वागत करण्यात आले. नवीन प्राध्यापकांचे ही गुलाब बुके देऊन प्राचार्यांनी स्वागत केले. स्वागतानंतर प्रियांका पाटील, समीक्षा सुतार या विधार्थ्यींनींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. डॉ. सदानंद गावडे. प्रा. शिवानंद सिद्धगोंड, डॉ. सुनीता कांबळे, प्रा. मनीषा कांबळे, प्रा. प्रभा पवार, प्रा. गावडे यांनी मनोगते व्यक्त केली.                                यानंतर ओरिंटेशन कार्यक्रमात नेकचे समन्वव्यक प्रा. मुकेश कांबळे यांनी आय. क्यू. ए. सी. विभागाचे कामकाज आणि नेक् तयार आवश्यक असणाऱ्यां  महाविद्यालयातील सर्व घटकाचा आढावा घेऊन उजाळा वर्गाचा हेतू स्पष्ट केला. ओरिंटेशन कार्यक्रमात विविध विषयांची सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये एन. एस. एस. विभागाचा डॉ. के. एस. काळे, क्रीडा. विभागाचा प्रा. आर. टी. पाटील, सांस्कृतिक विभांगाचा प्रा. डॉ. आर. डी. कांबळे, अँटी रंगिंग, आय. सी. सी. च्या विभागाचा प्रा. शीतल मंडले यांनी माहिती देऊन आढावा घेऊन कामकाजाची चर्चा केली.

      अध्यक्षीय समारोपात प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी महाविद्यालयाच्या विकासात सर्व घटक खूप मोलाचे योगदान देणार असतात म्हणून कौतुक करून नवागतांचे मनापासून स्वागत केले.

         यावेळी प्रॉ. डॉ. ए. के. कांबळे, डॉ. के. पी. वाघमारे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. व्ही. के. दळवी, डॉ. दीपक पाटील, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. एस. बी. पाटील उपस्थित होते. आभार डॉ. ए. एस. आरभोळे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. मोहन घोळसे यांनी केले. यावेळी कला वाणिज्य आणि विज्ञान विभागातील  सर्व  प्रमुख प्राध्यापक.विध्यर्थी प्रशासकीय सेवक वृंद कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले होते.

No comments:

Post a Comment