नवीन वर्षाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळावर होणारे गैरप्रकार रोखा - विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

नवीन वर्षाच्या नावाखाली प्रेक्षणीय स्थळावर होणारे गैरप्रकार रोखा - विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाची मागणी

प्रेक्षणीय स्थळावर होणारे गैरप्रकार रोखण्याचे निवेदन पोलिसांना देताना विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाचे पदाधिकारी.

निपाणी / प्रतिनिधी

      नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले तथा सार्वजनिक ठिकाणी होणारे गैरप्रकार रोखा, तसेच फटाके फोडण्यावर प्रतिबंध आणा अशी मागणी विश्व हिंदू परीषद व बजरंग दलाने निवेदनातून केली आहे. याबाबतचे निवेदन निपाणी पोलिसांच्याकडे देण्यात आले आहे. यावेळी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे निपाणी तालुका प्रखंड प्रमुख प्रविण चव्हाण, निपाणी शहरं संघटक मंत्रि राजु पुरंत, अजित दादा पारळे, सचिन जाधव, विशाल जाधव, निवास पवार, आभि रावळ, आतिश चव्हाण, दिपक कुरणे, चंद्रकांत पोळ उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment