सरोळी येथील प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

सरोळी येथील प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा

सरोळी प्राथमिक शाळेत गणित दिन कार्यक्रमावेळी माहीती देताना शिक्षक.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        २२ डिसेंबर या राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त शाळेत करचक्रम साजरा झाला. राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य साधून प्रश्नमंजुषा स्पर्धा व चित्रकला स्पर्धा झाल्या. 

         सर्वप्रथम प्रशांत पाटील यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या विषयी माहिती सांगितली. ज्या गणित तज्ञांचा मेंदू झोपेत ही कार्यरत होता. ज्यांनी अनेक गणितीय संबोध स्पष्ट केले त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना खूप आवड निर्माण झाली. 

    त्यानंतर शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष यांच्या शुभहस्ते प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उदघाटन झाले. 6 गटात व 5 फेरीमध्ये झालेल्या स्पर्धेत शेवटपर्यंत चुरस निर्माण झाली. शेवटी मनाली गट 68 गन घेऊन प्रथम तर अर्पित गट 63 गन घेऊन द्वितीय स्थानावर राहिला. चित्रकला स्पर्धेत तब्बल 22 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

          स्पर्धेचं नियोजन प्रभारी  मुख्याध्यापक सुरेश सावंत यांनी केले. तर स्पर्धा यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी विषय शिक्षक के. पी. भोगण, प्रशांत पाटील, उदय पाटील व शालेय मंत्री मंडळ यांनी परिश्रम घेतले. आभार उदय पाटील यांनी मानले.No comments:

Post a Comment