दौलतचे कामगार ते एअर इंडियाचे माजी जनरल मॅनेजर झालेल्या निट्टूच्या व्ही. डी. पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

दौलतचे कामगार ते एअर इंडियाचे माजी जनरल मॅनेजर झालेल्या निट्टूच्या व्ही. डी. पाटील यांचे निधन

व्ही. डी. पाटील


तेऊरवाडी /सी. एल. वृत्तसेवा

       आपल्या स्वकतृत्वावर दौलत कारखाना कामगार ते एअर इंडिया जनरल मॅनेजर या अतिउच्च पदापर्यंत गुरूडभरारी घेतलेल्या व्ही. डी. पाटील यांचे शनिवारी (ता. २५) आज निधन झाले.

        शिवाजी विद्यापिठाची मॅकॅनिकल इंजीनिअरिंग पदवी घेतलेलेले व्ही. डी. पाटील दौलतला कामगार म्हणून नोकरिस लागले. व्यवस्थापनाशी जूळवून घेता न आल्याने दौलत ची नोकरी सोडून नाशिकला नोकरी चालू केली. तेथून एअर इंडियामध्ये लागल्यानंतर  स्वतःच्या कतृत्वावर थेट जनरल मॅनेजर म्हणून अत्यंत चांगल्या प्रकारे विमानतळ व विमान सेवा सांभाळून यामध्ये अमूलाग्र बदल केले. तेथून निवृत झाल्यानंतर ते निटूरला रहायला आले  होते. सतत वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करणे हा त्यांचा छंद होता. आपल्या घराभोवती पक्षासाठी पाण्याची व खाण्याची व्यवस्था करण्यामध्ये त्याना विशेष आवड होती. त्यांच्या आकस्मित निधनाने निटूर गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात डॉ. एम. डी. पाटील व एअर फोर्समधून निवृत्त झालेला मोहन पाटील असे दोन भाऊ, विवाहीत बहिण, भावजया, पत्नी, उच्चशिक्षित मुलगा  व सून, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment