तावरेवाडी येथे जमिन वादातून महिलेस मारहाण, चौघांवर गुन्हे दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

25 December 2021

तावरेवाडी येथे जमिन वादातून महिलेस मारहाण, चौघांवर गुन्हे दाखल

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         तावरेवाडी (ता. चंदगड) येथे गोबरगॅसचे कुंपण तोडल्यावरून दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. विमल अरुण कागणकर या महिलेला खुरप्याने वार करून गंभीर जखमी केले. या बाबत विमल कागणकर यांनी  आशीर्वाद जोतिबा कागणकर, लखन जोतिबा कागणकर, भागोजी निंगाप्पा कागणकर, मंगल जोतिबा कागणकर या चौघा विरोधात चंदगड पोलिसात फिर्याद दिली आहे.

            पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, `गोबरगॅसचे कुंपण तोडल्यावरून फिर्यादी विमल आणि आरोपी भागोजी कागणकर यांच्यात मध्ये वाद सुरु झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये विमल यांच्या डाव्या हातावर खुरप्याने मारून तसेच तोंडावर बुक्क्यांनी मारूत दात पाडल्याची घटना घडली आहे. यामध्ये भागोजी कागणकर यांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप फिर्यादी विमल यांनी केला असून याप्रकरणी चौघांविरोधात चंदगड पोलिसांत फिर्याद दिली आहे. अधिक तपास पो. ना. मकानदार करत आहे.

No comments:

Post a Comment