अनुप्रिया गावडे बनली राष्ट्रीय मानव अधिकार संघटना न्यू दिल्लीची ब्रँड ॲम्बेसिडर, चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा - चंदगड लाईव्ह न्युज

10 January 2022

अनुप्रिया गावडे बनली राष्ट्रीय मानव अधिकार संघटना न्यू दिल्लीची ब्रँड ॲम्बेसिडर, चंदगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

अनुप्रिया गावडेला राष्ट्रीय मानव अधिकार संघटना न्यू दिल्लीची ब्रँड ॲम्बेसिडर चे प्रमाणपत्र देताना मान्यवर.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा 

 शांतीनिकेतन स्कूलमध्ये इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विश्वविक्रमवीर भारतभूषण अनुप्रिया गावडेला न्यू दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय वन व पर्यावरण, युवा खेळ कल्याण जलसंसाधन राज्यमंत्री मामा माटुंगा, सुप्रीम कोर्टचे माजी मुख्य न्यायाधीश के. जी. बालकृष्णन, मिसेस इंडिया अलिशा, राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष श्री जितेंद्र रवी यांच्या हस्ते प्रतिष्ठित इंडियन आयकॉन व इंडियन एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. 

          या कार्यक्रमात देशभरातील प्रतिष्ठित उद्योगपती, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, खेळ अशा विविध क्षेत्रांमधील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अनुप्रियाने भारतीय संविधान व मानवी अधिकार आणि बालहक्क कायदा या विषयावर मांडलेल्या मतानी सर्वांची मने जिंकली व कॅबिनेट मंत्रालयाच्या विविध मंत्री व उपस्थित सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजराने तिचे कौतुक केले. तिच्या या सादरीकरणाने तिला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने महाराष्ट्राची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून घोषित केले  व त्यांच्या सल्लागार समितीचे सदस्य पदीही निवड केली. हा बहुमान मिळवणारी ती सर्वात लहान एकमेव भारतीय आहे. या ठिकाणी तिने बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलगी शिकली प्रगती झाली, बाल कामगार थांबवा हा नारा दिला. ब्रँड ॲम्बेसिडर या नात्याने अनुप्रिया संपूर्ण महाराष्ट्रात संविधान व बाल हक्काबाबत जाणीव जागृतीची मोहीम हाती घेणार आहे

              यापूर्वी तिने अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार मिळवले असून रामदास आठवले प्रतिष्ठानतर्फे तिला कोल्हापूर जिल्ह्याची ॲम्बेसिडर म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. तिने अनेक ओलिंपियाड परीक्षेत आंतरराष्ट्रीय क्रमांक मिळवला असून, अनेक सुवर्णपदकांची ती मानकरी ठरली आहे. या सोबत अनेक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे व अनेक शाळा महाविद्यालय व कार्यक्रमात तिने व्याख्यान दिले आहे.

            यासाठी तिला आई प्रा. डॉ. अक्षता गावडे व वडील सीए अमितकुमार गावडे व शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment