चंदगड येथील `हॉटेल प्रणाम` च्या "लकी ड्रॉ "ची बुधवारी सोडत, चंदगड लाईव्हच्या युट्युबर चॅनलवर पाहता येणार लाईव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

चंदगड येथील `हॉटेल प्रणाम` च्या "लकी ड्रॉ "ची बुधवारी सोडत, चंदगड लाईव्हच्या युट्युबर चॅनलवर पाहता येणार लाईव्ह

चंदगड शहरातील खवय्यांच्या पसंतीला उतरलेले `हाॅटेल प्रणाम`

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड येथील अल्पावधीत खव्वयांच्या पसंतीस उतरलेल्या`हॉटेल प्रणाम`च्या वतीने खवय्यासाठी `लकी ड्रा` योजना राबवली होती. २५ जानेवारी २०२२ या योजनेचा शेवटचा दिवस होता. १ डिसेंबर २०२१ ते २५ जानेवारी २०२२ या कालावधीसाठी हि `लकी ड्रा` योजना राबवली होती. २६ जानेवारी २०२२ रोजी या योजनेची सोडत काढली जाणार आहे. `प्रणाम` येथे बुधवारी दुपारी १ वाजता चंदगडच्या प्रथम नागरीक सौ. प्राची काणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढणार असल्याची माहीती प्रणामचे संचालक,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी दिली.

`हॉटेल प्रमाण`च्या लकी ड्रा योजनेतील तिकिटाचा नमुना.

     गेल्या दिड महिन्यापासून चंदगड येथील `हॉटेल प्रणाम` हे खवय्यांच्या पसंतीला उतरले आहे. `हॉटेल प्रमाण` च्या प्रारंभीपासून या हॉटेलमध्ये खवय्यांची गर्दी आहे. उत्कृष्ट इंटेरिअर डिझाईन, आकर्षक विद्युत रोषणाई, फर्निचर, उत्तम दर्जाची सेवा व चविष्ट विविध खाद्यपदार्थं, ते ही ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत. त्यामुळे हॉटेलमध्ये ग्राहकांची नेहमी गर्दी असते. आजही लोक आपल्या कुटुंबासहित या हॉटेलमध्ये जेवायला जाणे पसंद करतात. 

`लकी ड्रा` योजनेतील ५ बक्षिसे पुढीलप्रमाणे – 

१) प्रथम क्रमांकासाठी – ज्युपीपर दुचाकी, 

२) दुसऱ्या क्रमांकासाठी – वॉशिंग मशिन, 

३) तिसऱ्या क्रमांकासाठी – एलईडी टीव्ही, 

४) चौथ्या क्रमांकासाठी - मोबाईल 

५) पाचव्या क्रमांकासाठी - मोबाईल

     खास ग्राहकांच्यासाठी हॉटेल प्रणामच्या वतीने आम्ही लकी ड्रॉ योजना देखील ठेवली आहे. यामध्ये शंभर रुपयाच्या बिलावर ग्राहकाला एक कुपन दिले जात आहे. 26 जानेवारी 2022 रोजी त्याची सोडत काढण्यात येणार आहे.

     विश्वासाहर्ता जपण्यासाठी व कोरोणाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातील प्रमुख न्युज पोर्टल व युट्युब चॅनल असलेल्या सी. एल. न्यूज अर्थात चंदगड लाईव्ह न्युजच्या माध्यमातून सोडतीचा कार्यक्रम लाईव्ह दाखविला जाणार आहे. या सोडतीच्या कार्यक्रमासाठी चंदगडच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सौ. प्राची काणेकर या प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम २६ जानेवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजता होईल. पाच लहान मुलांच्या हस्ते पाच चिठ्ठ्या काढून विजेत्यांची नावे घोषित करण्यात येणार आहेत. 

       कॉलेजच्या युवक-युवतींसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी १० टक्के डिस्काऊंट

   कॉलेजच्या युवक-युवतींसाठी व शालेय विद्यार्थ्यांसाठी हॉटेल प्रणामच्या वतीने २६ जानेवारी २०२२ पासून खवय्यांच्या पसंतीनुसार सध्या शिकत शालेय विद्यार्थ्यांना त्यांनी कॉलेजचे ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांच्या एकूण बिलावर १०% डिस्काउंट दिला जाणार आहे. हा डिस्काउंट केवळ शालेय विद्यार्थ्यांसाठी देणार असल्याचे प्रणामचे मालक लक्ष्मण गावडे यांनी सांगितले.

          `हॉटेल प्रणाम`ची `लकी ड्रा` योजना लाईव्ह पाहण्यासाठी chandgad live news चे युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉनवर टच करुन ऑल वर क्लिक करा. 

chandgad live news Youtube Link - https://www.youtube.com/c/ChandgadLiveNews

No comments:

Post a Comment