बेकिनकेरे येथे बुधवारी शहीद जवानांचे स्मारक पूजन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन धन वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

बेकिनकेरे येथे बुधवारी शहीद जवानांचे स्मारक पूजन, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन धन वाटप

 


 कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 बेकिनकेरे (ता. बेळगाव)  येथे कोवाड मार्गावरील शहीद जवान भरमा कुटाळे व कल्लाप्पा खादरवाडकर या दोघांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवरील  शहीद जवानांच्या पुतळ्यांचे पूजन, प्रजासत्ताक दिन व दहावी मध्ये अनुक्रमे प्रथम, व्दितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचा धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती वीरपत्नी रेखा खादरवाडकर व लक्ष्मी कुटाळे यांनी दिली. बुधवारी सकाळी ८ वाजता प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करून व शहीद जवान कुटाळे व खादरवाडकर यांच्या स्मारकाचे पूजन कार्यक्रम होईल. यानंतर दहावी मध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या प्रत्येकी तीन हजार रुपयांची धनादेश वाटप करण्यात येणार आहेत. सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. No comments:

Post a Comment