चंदगड येथील किलबिल स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती, नगरपंचायत वर्धापनदिन व माजी वसुंधरा अभियान संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2022

चंदगड येथील किलबिल स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती, नगरपंचायत वर्धापनदिन व माजी वसुंधरा अभियान संपन्न

नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, नगरसेवक अभिजित गुरबे, संजय चंदगडकर, सचिन नेसरीकर, नेत्रदीपा कांबळे, संजना कोकरेकर, प्रमिला गावडे  सर्व नगरसेवक तसेच नगरपंचायतीचा सर्व स्टाफ


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         कीलबिल स्कूल चंदगड येथे सावित्रीबाई फुले जयंती नगरपंचायत वर्धापन दिन व माजी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. चंदगडच्या नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, नगरसेवक अभिजित गुरबे, संजय चंदगडकर, सचिन नेसरीकर, नेत्रदीपा कांबळे, संजना कोकरेकर, प्रमिला गावडे सर्व नगरसेवक तसेच नगरपंचायतीचा सर्व स्टाफ उपस्थित होता. 

       किलबिल संकुलाच्या नवीन इमारतीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन संकुलाची इमारत पाहून व विद्यार्थ्यांसाठी केलेली निवासाची व स्पर्धा परीक्षां केंद्राची पाहणी करून नगराध्यक्ष यांनी संकुलाचे तोंडभरून कौतुक केले चंदगड मध्ये अशा संकुलनाची गरज होती. अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यापुढे संकुलाला लागणारी सर्व तोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष यांनी दिली. यानंतर नगरसेवक संजय चंदगडकर यांनीसुद्धा किलबिलचा वाढता आलेख पाहून समाधान वाटलेचे मनोगत व्यक्त केले. किलबिल संकुलाला यापूर्वी आमचे सहकाय होते. यापुढेही नगरपालिकेचे सहकार्य लाभेल असे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष  संदीप चिंचणगी यांनी संस्थेच्या कार्याचा व संस्थेने चालू केलेले निवासी संकुल विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एस. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. एस. पाटील यांनी केले. शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एस. चिंचणणी यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमास राजश्री शाहू विद्या निकेतनचे मुख्याध्यापक तुषार लोंढे, राहुल फडणीस, डी. एन. पाटील, पुनम आजरेकर, निवृत्ती गावडे, काजल गावडे,  सोमनाथ गावडे. इत्यादी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment