"पत्रकार दिन" २० फेब्रूवारीला साजरा करणार, चंदगड तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय, ६ जानेवारी हा दिवस "दर्पण दिन" - चंदगड लाईव्ह न्युज

05 January 2022

"पत्रकार दिन" २० फेब्रूवारीला साजरा करणार, चंदगड तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय, ६ जानेवारी हा दिवस "दर्पण दिन"

आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

             चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) ६ जानेवारी हा दिवस आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन २० फेब्रुवारी रोजी पत्रकार दिन म्हणून साजरा करणार आहे. तर ६ जानेवारी हा दर्पण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

        अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केलेल्या अवहानानुसार काल चंदगड येथे घेण्यात आलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे होते.

         प्रारंभी स्वागत उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी करून संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. संघटनेचे संस्थापक अनिल धुपदाळे यांनी गुगलवर बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मतारीख ६ जानेवारी दाखविली आहे. त्यामुळे अनेकजण ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याने हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अशा पोस्ट फिरवतात हे पूर्णतः चुकीचे आहे. सरकारने देखील २० फेब्रुवारी हीच बाळशास्त्री जांभेकरांची जन्मतारीख असल्याचे स्पष्ट करून त्या दिवशी जांभेकरांची जयंती राज्यभर साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिली जात असली तरी आपण न विसरता दरवर्षी तीच चूक करत असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगूनही आपण चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडत असल्याचे म्हणाले. त्यामुळे ६ जानेवारीला दर्पण दिन साजरा करावा, असे आवाहन केले. उदयकुमार देशपांडे यांनी राज्यातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाची वाटचाल सूरू असल्याचे सांगितले. यावेळी अध्यक्ष नंदकुमार ढेरे, उपाध्यक्ष  श्रीकांत पाटील, संस्थापक अनिल धुपदाळे, उदयकुमार देशपांडे, खजिनदार संपत पाटील, सचिव चेतन शेरेगार, संजय पाटील, संजय मष्णु पाटील, संदिप तारीहाळकर, निवृत्ती हारकारे, राजेंद्र शिवनगेकर, प्रकाश एेनापुरे, नंदकिशोर गावडे, महेश बसापुरे, तातोबा गावडा, संतोष सुतार, शहानुर मुल्ला, बाबासाहेब मुल्ला यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. 

     आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावी झाला. ६ जानेवारी, १८३२ रोजी जांभेकर यांनी 'दर्पण' हे नियतकालिक सुरू केलं. त्याचं स्मरण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी महाराष्ट्रात पत्रकार दिन किंवा दर्पण दिन साजरा करतो, अशी माहिती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे. गुगलवर बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मतारीख ६ जानेवारी दाखविली आहे. त्यामुळे अनेकजण ६ जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती असल्याने हा दिवस पत्रकार दिनम्हणून साजरा केला जातो अशा पोस्ट फिरवतात हे पूर्णतः चुकीचे आहे. सरकारने देखील २० फेब्रुवारी हीच बाळशास्त्री जांभेकरांची जन्मतारीख असल्याचे स्पष्ट करून त्यादिवशी जांभेकरांची जयंती राज्यभर साजरी करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती मराठी पत्रकार परिषदेकडून दरवर्षी दिली जात असली तरी आपण न विसरता दरवर्षी तीच चूक करत असल्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी सांगून आपण चुकीचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडत असल्याचे म्हणाले. त्यामुळे ६ जानेवारीला दर्पण दिन साजरा करताना काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी पत्रसृष्टीला केले आहे.

No comments:

Post a Comment